scorecardresearch

Premium

उरण मध्ये गोवरचा संशयित रुग्ण

करोना नंतर गोवरची साथ पसरली आहे. यामध्ये उरण तालुक्यातील एक संशयित आढळून आला आहे.

Free Measles Vaccination at Pune Municipal Hospitals
संग्रहित छायाचित्र

उरण: करोना नंतर गोवरची साथ पसरली आहे. यामध्ये उरण तालुक्यातील एक संशयित आढळून आला आहे. त्याच्या रक्ताचे नमुने तपासणी साठी पाठविण्यात आले असल्याची माहिती उरण तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे. गोवरच्या साथीमुळे सध्या नागरिकां समोर नवीन संकट आले आहे. ही साथ पसरू नये या करीता आरोग्य विभागाकडून विविध उपायोजना आणि उपक्रम राबविले जात आहेत. मात्र सावधानता म्हणून आरोग्य विभाग सतर्क झाले आहे. तसेच नागरिकांना गावागावातून आशा वर्कर कडून सूचना व जनजागरण केले जात आहे. उरण मध्ये एक गोवर संशयित आढळला असून त्याची तपासणी केली जात असून तपासणी नंतर त्याच्यावर उपचार केले जाणार असल्याची माहिती उरण तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र इटकरे यांनी दिली आहे. त्याच प्रमाणे गोवर ची लक्षणे असल्यास खाजगी रुग्णालयाने ही रुग्णांची माहिती देण्याच्या सूचना देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नवी मुंबईत गोवरचे २३रुग्ण; जुहूगाव, सीबीडी बेलापूर, करावे, पावणे प्रभावी क्षेत्र जाहीर

reservoirs in Gondia district
गोंदिया जिल्ह्यातील ४३ जलाशये तुडुंब, पण गतवर्षीच्या तुलनेत जलसाठा कमीच
Cleanliness drive in Panvel area
पनवेल परिसर, उपजिल्हा रुग्णालय आणि सिडको भवनामध्ये स्वच्छता मोहीम
industries in Chandrapur district
चंद्रपूर जिल्ह्यातील २८३ उद्योग ‘रेड झोन’मध्ये, तर ७०८ ग्रीन अन् ३५४ ऑरेंज झोनमध्ये
Water in Kalmana
नागपूर : कळमना, वाठोडा परिसरात पाणीच पाणी, नंदनवन झोपडपट्टी पाण्यात

मुंबईसह विविध शहरांमध्ये गोवरचा प्रभाव वाढत असून नवी मुंबई शहरात गोवर लसीकरण प्रभावीपणे पार पडले असल्याने रुग्णांची संख्या आटोक्यात आहे. आतापर्यंत शहरात २३ गोवर बाधित रुग्ण आढळले आहेत. तर महापालिकेकडून शहरातील जुहूगाव, सीबीडी बेलापूर, करावे, पावणे हे चार गोवर प्रभावी क्षेत्र जाहीर करण्यात आले आहेत. या ठिकाणी दोन ते तीन रुग्ण आढळले असल्याची महिती आरोग्य अधिकारी यांनी दिली आहे.

हेही वाचा >>> पनवेल: कर्णकर्कश आवाजाचे ४७ सायलेन्सर नष्ट

महापालिकेकडून नियमित लसीकरण टास्क फोर्सची विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी महापालिका आयुक्त  राजेश नार्वेकर यांनी नवी मुंबई शहरातील गोवर स्थितीचा आढावा घेऊन नियंत्रणात राहण्यासाठी अधिक गतीमानतेने कृतीशील कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. नवी मुंबईमध्ये सुरूवातीपासूनच सातत्याने लसीकरण सुरू ठेवल्याने गोवर बाधितांचे प्रमाण काहीसे मर्यादित असल्याचे दिसून येते. महानगरपालिका क्षेत्रात ११ ठिकाणी गोवरचा प्रभाव दिसून आला असून त्यामधील ३ क्षेत्रातील प्रभाव खंडीत करण्यात आला आहे. उर्वरित ८ क्षेत्रांपैकी जुहूगाव, सीबीडी बेलापूर, करावे, पावणे या नागरी आरोग्य केंद्र परिसरातील ४ क्षेत्रे गोवर प्रभावित क्षेत्रे म्हणून घोषित करण्यात आले असून त्याठिकाणी विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

हेही वाचा >>> नेरुळमध्ये शिवाजी चौकाचा कायापालट; सिंहासनारुढ शिवरायांच्या पुतळ्याचे आकर्षण…

महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांच्या आदेशानुसार गोवरचा नवीन रुग्ण आढळल्यास त्या भागात ९ महिने ते ५ वर्ष वयाच्या बालकांना मिझेल रुबेलो लसीचा १ अतिरिक्त डोस देण्याचे सूचित करण्यात आले आहे.  त्यानुसार जुहूगाव, सीबीडी बेलापूर, करावे, पावणे या चार नागरी आरोग्य केंद्रांच्या गोवर प्रभावित परिसरात एमआर लसीचा १ अतिरिक्त डोस देण्याचे निश्चित करण्यात आले. त्याचप्रमाणे जुहूगाव, सीबीडी बेलापूर, करावे या ३ क्षेत्रातील ६ महिने ते ९ महिने वयाच्या बालकास एमआर लसीचा झिरो डोस देण्याचा निर्णय घेण्यात आला.

हेही वाचा >>> पनवेलच्या खाडीपात्रात वाळू उपसा करणाऱ्यांविरोधात अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचा कारवाईचा धडाका

१३ हजारहून अधिक बालकांचे लसीकरण उदिष्ट

नागरी आरोग्य केंद्र, जुहूगाव, सीबीडी बेलापूर, करावे, पावणे यांच्यामार्फत त्या त्या गोवर प्रभावी परिसरात अतिरिक्त डोस देण्याची तयारी पूर्ण झाली आहे. ६ महिने ते ९ महिने वर्षाआतील ८४५ बालके व ९ महिने ते ५ वर्ष वयाची १३०९८ बालके असे एकूण १३९४३ बालकांचे उदिष्ट नजरेसमोर ठेवून १ डिसेंबर रोजी २४, २ डिसेंबर रोजी २९ व ३ डिसेंबर रोजी ३० अशाप्रकारे ३ दिवसात ८३ अतिरिक्त लसीकरण सत्रांचे नियोजन करण्यात आले आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Suspected measles patient uran blood sample test health by the authorities uran news ysh

First published on: 02-12-2022 at 12:49 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×