स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी शनिवारी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील भाजीपाला बाजारातील व्यापारी आणि या बाजारात शेतमाल घेऊन आलेल्या शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. ते एका खाजगी कार्यक्रमासाठी नवी मुंबईत आले असता त्यांनी बाजार समितिला भेट देत पाहणी दौरा केला. यावेळी व्यापारी आणि बाजार घटकांनी बाजारातील समस्या राजू शेट्टींसमोर मांडल्या.

हेही वाचा- नवी मुंबई : पनवेल पालिकेच्या ५० कोटी रुपये खर्चाच्या मलनिस्सारण प्रकल्पास सरकारची मंजूरी

Success Story Mira Kulkarni
एकट्या मातेची मेणबत्ती व्यवसायाने सुरुवात; भारतातील सर्वांत श्रीमंत महिलांच्या यादीतील स्थानापर्यंत गरुडझेप!
global capital market, samir arora, mutual fund, samir arora journey in market, samir arora and global market journey, samir arora work, helios mutual fund, alliance capital management, asset management comapanies, hdfc limited, hdfc bank, samir arora thoughts in hdfc merge,
बाजारातील माणसं : जागतिक भांडवल बाजारातील अनुभवी खेळाडू : समीर अरोरा
onine
नाशिकमध्ये पर्यायी कांदा बाजार सुरू; तरीही शेतकऱ्यांची लूट ?
Best Coworking Spaces in Pune
कार्यालयीन जागा सहकार्यात पुणे देशात आघाडीवर

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती ही आशिया खंडातील सर्वात मोठी बाजार पेठ आहे. परंतु आज ही या आधुनिक युगात बाजार समिती मूलभूत सेवा सुविधा पुरवण्यात कमी पडत आहे. बाजार समितीत नित्यनेमाने हजारो वाहनातून शेतमाल दाखक होतो. परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या वाहनांना आज पार्किंग व्यवस्था नाही. एक ट्रक टर्मिनस होता त्या जागेत ही सिडकोच्यावतीने गृहसंकुल उभारण्यात येत आहे. बाजारात येणाऱ्या वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था नाही. त्यामुळे बाजार आवाराच्या बाहेर उभ्या असलेल्या वाहनांना बेकायदा पार्किंग कारवाई होतात. बाहेर उभ्या वाहनांमधून शेतमाल चोरीला जाणे, बाजार आवारात स्वच्छतेचा अभाव तसेच शेतकऱ्यांना शेतमालाचे पैसे वेळेवर न मिळणे आदी समस्या व्यापारी आणि शेतकऱ्यांनी राजू शेट्टी यांच्या समोर मांडल्या. या मांडलेल्या समस्या बाजार समिती तसेच शासन दरबारी मांडून त्या सोडवण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन यावेळी राजू शेट्टी यांनी व्यापारी आणि शेतकऱ्यांना दिले.