लोकसत्ता, प्रतिनिधी

नवी मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता ही सेवा उपक्रमांतर्गत रविवार, १ ऑक्टोबर रोजी, सकाळी १० वाजता संपूर्ण देशातील नागरिकांनी आपापल्या भागात एकत्रित येऊन एकाच वेळी एक तास स्वच्छतेसाठी श्रमदान करण्याचे देशव्यापी आवाहन केले आहे.

pune metropolis have lack of basic facilities and infrastructure
बकालीकरणाकडे…
Eknath Shinde
Eknath Shinde : तुम्ही गृहखातं, विधानसभा अध्यक्षपद मागितलं…
traffic system in Swargate area will changed on Tuesday November 19 and Wednesday November 20 pune
स्वारगेट भागात दोन दिवस वाहतूक बदल, मतदान साहित्याच्या वाहतुकीसाठी पीएमपी बस
Alum Cleaning Hacks
घरातील फरशी चकाचक करण्यासाठी तुरटी आहे अत्यंत फायदेशीर; जाणून घ्या सोप्या टिप्स
Deportation of 101 criminals within Maval Vidhan Sabha Constituency Police Station limits Pune news
मावळचे वातावरण तापले! तालुक्यातून १०१ गुन्हेगार हद्दपार
Priyanka Gandhi statement regarding those who show BJP flags during road shows
रोड-शो दरम्यान भाजपचे झेंडे दाखवणाऱ्यांना प्रियंका गांधी म्हणाल्या, तुम्हाला शुभेच्छा मात्र…
Cash theft of four lakhs by breaking the door of the clothing store pune news
वस्त्रदालानाचा दरवाजा उचकटून पावणेचार लाखांची रोकड चोरी

त्यास अनुसरुन स्वच्छतेमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारे नवी मुंबई शहर ‘स्वच्छता ही सेवा’ या मोहिमेअंतर्गत महात्मा गांधी जयंतीच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या या स्वच्छता अभियानाच्या आयोजनाकरिता सज्ज झाले आहे. पालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनानुसार महापालिका क्षेत्रात आठही प्रशासकीय वॉर्डांतील १११ निवडणूक प्रभागांत प्रत्येकी २ याप्रमाणे २२२ हून अधिक ठिकाणी ही स्वच्छता मोहीम व्यापक स्वरुपात राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

आणखी वाचा-अनंत चतुर्दशीदिनी सार्वजनिक गणेश विसर्जन सोहळ्यासाठी सामाजिक संस्थांचे हजारो हात पालिकेच्या मदतीला

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही उपक्रमाच्या यशस्वी आयोजनाच्या दृष्टीने मौल्यवान सूचना दिलेल्या आहेत. त्यास अनुसरुन नवी मुंबई महानगरपालिका उत्साहाने भव्यतम स्वरूपात मोहीम आयोजनाविषयी कार्यवाही करत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून संपूर्ण नवी मुंबई शहर पुन्हा एकवार स्वच्छतेच्या उद्दिष्टाने प्रेरीत होऊन झळाळणार आहे.

नवी मुंबई आणि स्वच्छता हे आता परस्परपूरक शब्द मानले जात असून नुकत्याच १७ सप्टेंबरला संपन्न झालेल्या स्वच्छताविषयक विशेष उपक्रमात आठही विभाग कार्यालय क्षेत्रात १ लाख १४ हजारहून अधिक नागरिकांनी एकत्र येत सकाळी ठीक ८ वाजता एकाच वेळी स्वच्छतेची शपथ ग्रहण करीत समूहशक्तीचे व एकतेचे दर्शन घडविले होते.अशाच प्रकारे स्वच्छताप्रेमी नवी मुंबईकर नागरिक रविवारी आपापल्या भागात एकत्र येऊन सकाळी ठीक १० वाजता एकाच वेळी, एक तास परिसर स्वच्छता करणार आहेत.यामध्ये प्रभागातील प्रमुख जागा, बाजार, रेल्वे स्टेशन, बस डेपो, चौपाटी, पर्यटन स्थळे, उदयाने, नाले परिसर, शाळा, महाविदयालये, रुग्णालये, आरोग्य केंद्रे अशा विविध ठिकाणी नागरिकांच्या सहभागातून स्वच्छता मोहिम राबविली जाणार आहे. या प्रत्येक स्थळाकरिता समन्वयकाची नेमणूक करण्यात येत आहे.

आणखी वाचा-१५० सीसीटीव्ही निरीक्षणातून अपहरणाचा छडा; ४ वर्षीय चिमुरडीची सुटका, आरोपीला अटक

१५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत राबविल्या जाणा-या ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमांतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने दररोज स्वच्छता विषयक विविध उपक्रमांचेआयोजन केले जात असून १ ऑक्टोबरला संपूर्ण नवी मुंबई क्षेत्राला स्वच्छतेच्या धाग्याने जोडणारा विविध ठिकाणांच्या स्वच्छता मोहीमेचा उपक्रम भव्यतम स्वरुपात राबविला जात आहे.या उपक्रमांमध्ये लोकप्रतिनिधी तसेच स्वयंसेवी संस्था व मंडळे यांचे प्रतिनिधी, महिला संस्था व महिला बचत गटांचे प्रतिनिधी, शाळा महाविद्यालये यांचे विद्यार्थी व शिक्षक आणि पालक, विविध संघटनांचे प्रतिनिधी यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन पालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी केले आहे. प्रत्येक नागरिकाने स्वच्छता ही आपली जबाबदारी मानून २२२ ठिकाणांपैकी आपापल्या घराजवळील स्वच्छता मोहिमेमध्ये स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे आणि‘निश्चय केला, नंबर पहिला’ हे नवी मुंबईचे ध्येयवाक्य साध्य करण्यासाठी शहर स्वच्छतेसाठी एकत्रित योगदान दयावे असे आवाहन केले आहे.