scorecardresearch

तळोजातील सिडकोच्या ५७३० घरांची सोडत

नवी मुंबई परिसरातील वेगाने विकसित होत असलेल्या तळोजा नोडमध्ये मोठ्या प्रमाणात गृहबांधणी प्रकल्प सुरू आहेत.

नवी मुंबई: सिडको महामंडळातर्फे तळोजा नोडमध्ये उभारण्यात आलेल्या ५७३० घरांसाठी प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर ऑनलाइन अर्ज विक्री व नोंदणीला सुरुवात करण्यात आली. आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि सर्वसाधारण गटासाठी ही घरे उपलब्ध असून त्यासाठी २४ फेब्रुवारीपर्यंत अर्ज नोंदणी करता येणार आहे.

नवी मुंबई परिसरातील वेगाने विकसित होत असलेल्या तळोजा नोडमध्ये मोठ्या प्रमाणात गृहबांधणी प्रकल्प सुरू आहेत. मुंबई-पुणे महामार्ग, रेल्वे तसेच सिडकोच्या मेट्रो प्रकल्पामुळे या परिसराला दळणवळणदृष्ट्या महत्त्व प्राप्त झाले आहे. तसेच येथील घरांचे दरही सर्वसामान्यांच्या आवाक्यात आहेत. या पार्श्वभूमीवर सिडकोने ५७३० घरांसाठीची सोडत योजना प्रजासत्ताक दिनापासून सुरू केली आहे. यापैकी १५२४ घरे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी असून सर्वसाधारण प्रवर्गांसाठी ४२०६ घरे उपलब्ध आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील अर्जदारांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत २.५ लाख रुपयांचे अनुदानही मिळणार आहे. 

‘नवी मुंबईतील वेगाने विकसित होत असलेल्या आणि उत्तम कनेक्टिव्हिटी लाभलेल्या तळोजा नोडमध्ये परवडणाऱ्या दरातील ५७३० घरे उपलब्ध करून देत असून अधिकाधिक नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी केले. 

सोडतीबाबत महत्त्वाचे

https://lottery. cidcoindia.com या संकेतस्थळावर जाऊन सोडतीसाठी अर्ज नोंदणी करता येईल.

’ २६ जानेवारी ते २४ फेब्रुवारी अर्जनोंदणीची मुदत

’ २७ जानेवारीपासून अर्ज सादर करता येणार.

’ अनामत रक्कम भरण्याकरिता २७ जानेवारी ते २५ फेब्रुवारीपर्यंत मुदत

’ योजनेची संगणकीय सोडत ११ मार्च रोजी.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Taloja node by cidco corporation online application sales registration begins akp

ताज्या बातम्या