प्रवासी म्हणून बसून निर्जन ठिकाणी गाडी थांबवुन चाकूचा धाक दाखवून वाहन चालकास लुटणाऱ्या आरोपीस गुन्हे शाखेने अटक केले आहे. आरोपीच्या अटकेने अशाच प्रकारच्या दोन गुन्ह्यांची उकल झाली असून त्याच्या नावावर यापूर्वी चार गुन्हे दाखल असल्याचेही समोर आले आहे. आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे अटक आरोपीकडून कलंबोलीतुन जबरदस्ती चोरी केलेली  १०लाख रुपयांची  किंमतीची एर्टिगा  कार जप्त करण्यात आली आहे. आरोपींचे साथीदारांचा शोध सुरु आहे. 

हेही वाचा >>> उद्योगपतीचे अपहरण करायला दिल्लीत गेले नि अडकले! ; बुलढाण्याच्या युवकांना भोवला झटपट श्रीमंत होण्याचा नाद

मुंबई पुणे हा कायम गजबजलेला मार्ग असून हजारो गाड्यांची ये जा या रस्त्यावर होते यात अनेकदा किंवा प्रवासी भाडे वा  मालकाला सोडून अनेक वाहन चालक मुंबईतून पुण्यात जातात . जाताना दोन पैसे मिळण्यासाठी विविध मार्गावर थांबलेल्या प्रवाशांना घेतात. असे अनोळखी प्रवासी घेणे मात्र महागात पडत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ८ ऑगस्टला कळंबोली येथून चार प्रवासी पुण्याला जाण्यास एका गाडीत बसले व पुढे भातन बोगद्याच्या नजीक आल्यावर एकाने लघुशंकेचा बहाणा करून गाडी थांबवण्यास लावली व गाडी थांबली कि चाकूचा धाक दाखवून तिघांनी वाहन चालकाच्या जावळीत चीज वस्ती रोकड आणि मोबाईल काढून तसेच सोडून गाडी घेऊन निघून गेले या प्रकरणी कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता याचा समांतर तपास करताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे यांच्या पथकाने विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली व तांत्रिक तपासही सुरु ठेवला १२ तारखेला पोलीस उपनिरीक्षक मानसिंग यांना एक क्रमांक फलक (नंबर प्लेट ) नसलेली एर्टिगा गाडी विक्री करण्याचा प्रयत्न काही लोक करीत असल्याची माहिती पोलीस हवालदार हेमंत गडगे , सूर्यवंशी , राजनीती पाटील काटकर यांनी दिली. सदर गाडी टेम्बोडे पुला  जवळील परिसरात येणार असल्याची माहितीही मिळाली होती. या माहितीच्या आधारावर सापळा रचून आरोपी महेंद्रप्रताप उर्फ अंकीत ग्यानेंद्र सिंग,  मूळ गाव – प्रतापगड, राज्य उत्तर प्रदेश याला ताब्यात घेतले  त्याच्याकडे गाडी विषयी  चौकशी केली असता ती कलंबोलीतुन प्रवासी म्हणून बसून गेलो व गाडीत चाकूचा धाक दाखवून गाडी जबरदस्तीने चोरी केल्याची कबुली त्यांनी दिली .  

हेही वाचा >>> नागपुरात दिवसाढवळ्या तलवारीने युवकाचा खून

महेंद्रप्रताप कडे अधिक चौकशी केली असता १ ऑगस्टला सुद्धा त्याने त्याच्या साथीदारांसह खारघर येथील  हिरानंदानी उड्डाणपूल नजीक एका खाजगी प्रवासी घेऊन जाणाऱ्या  एर्टिगा   गाडीही अशीच चोरी केल्याची कबुली दिली त्यावेळीही अशाच प्रकारे कारला थांबवून वाकडला जायचे आहे असे सांगून कार मध्ये बसून खालापूर टोल नाकाच्या अलीकडे त्यांच्या पैकी एकाने उलटी येत असल्याचा बहाणा करून कार थांबवून ड्रायव्हरला चाकूचा धाक दाखवून रोख रक्कम घेतल्याची कबुली दिली याची शहानिशा केली असता सदर गुन्हा खालापूर पोलीस ठाण्यात नोंद असल्याचे समोर आले आरोपी आणि त्याचे साथीदार ” हायवे रॉबरी” सारख्या गुन्ह्यात सराईत असून त्यांच्या विरोधात या पूर्वीही  आरोपींच्या विरोधात    मानपाडा पोलीस ठाणे-२, समतानगर पोलीस ठाणे , ठाणे शहर, एन आर आय पोलीस ठाणे,(प्रत्येकी एक) गुन्हा  यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत.गिरीधर गोरे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक)अनोळखी वाहनात बसून प्रवास करणे जसे धोक्याचे आहे तसेच अनोळखी व्यक्तींना गाडीत घेणेही धोक्याचे आहे. या प्रकरणात एका टोळीतील एक आरोपीला अटक केले असून त्याच्या अन्य साथीदारांचा शोध सुरु आहे