नवी मुंबई शहरात मागील महिनाभरापासून शहरातील हवा गुणवत्ता निर्देशांक २०० ते ३०० एक्युआयहुन अधिक निदर्शनास येत आहे. शुक्रवारी नेरुळ येथील हवा गुणवत्ता निर्देशांक ३५३ असून राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. हवा गुणवत्तेत राज्यात मुबंईतील बांद्रा- कुर्ला कॉम्प्लेक्स आघाडीवर असून याठिकाणी सर्वाधिक ३९० एक्युआय त्यांनतर नेरुळचा नंबर लागत आहे. त्यामुळे नवी मुंबईची दिवसागणिक वाढत जाणाऱ्या या प्रदूषणाच्या विळख्यातुन सुटका कधी होणार? असा प्रश्न नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

हेही वाचा- तीन बायका अन् चौथीसोबत प्रेमप्रकरण; मृत प्रेयसीच्या सॅंडलमुळे आरोपी जिम ट्रेनर अटकेत

Citizens object to concreting works at unnecessary places in navi mumbai
नको तेथे काँक्रीट रिते! अनावश्यक ठिकाणी काँक्रीटीकरणाच्या कामांना नागरिकांचा आक्षेप, शहरभर वाहतूककोंडी
Sensex eight hundredth retreat due to concerns over US inflation protracted tariff cuts
अमेरिकेतील महागाई, लांबलेल्या दरकपातीच्या चिंतेने ‘सेन्सेक्स’ची आठ शतकी माघार
ring of fire
विश्लेषण : भूकंपप्रवण क्षेत्र म्हणून ओळखले जाणारे ‘रिंग ऑफ फायर’ नेमके कुठे आहे? या भागात सर्वाधिक भूकंप का होतात?
adani realty msrdc latest marahti news
वांद्रे रेक्लेमेशन पुनर्विकासाचे कंत्राट अदानी समूहाला, ‘एमएसआरडीसी’च्या मुख्यालयाच्या ठिकाणी लवकरच उत्तुंग इमारत

नवी मुंबई शहरात महानगरपालिकेच्यावतीने कंबर कसून स्वच्छतेत नवी मुंबई शहर अव्वल येण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहे . राहण्याजोग्या शहरात नवी मुंबईचा दुसरा क्रमांक लागत आहे. मात्र या नागरिकांच्या पसंतीस उतरणाऱ्या शहराला दिवसेंदिवस प्रदूषणाचा विळखा आणखीन घट्ट होत चालला आहे. राज्यातील चंद्रपूर औष्णिक विद्युत केंद्र असलेल्या चंद्रपूरचा हवा गुणवत्ता निर्देशांक देखील मुबंई नवी मुंबई पेक्षा कमी आहे. त्याठिकाणी कोळशापासून मोठ्या प्रमाणावर वीज निर्मिती होत असून हवेत मोठ्या प्रमाणावर धूर पहावयास मिळतो. तरीदेखील तेथील हवा गुणवत्ता मध्यम प्रकारात मोडत आहे. मात्र, नवी मुंबई आणि मुंबई मध्ये दिवसेंदिवस हवा गुणवत्ता ढासळत असल्याचे समोर येत आहे. एमआयडीसी मधील औद्योगिक कंपन्यांमधून सोडणारा वायू, शहरातील विकास कामे, रस्त्यावरील वाहने इत्यादी कारणामुळे शहरातील हवा गुणवत्ता खालावत आहे. शहरातील महापालिकेचे ऐरोली आणि नेरुळ से.१९अ येथील हवा गुणवत्ता केंद्र बंद असल्याने याठिकाणीची हवा गुणवत्ता निदर्शनास येत नाही, तर महापे कोपरखैरणे येथील हवा गुणवत्ता निर्देशांक २०९ तर नेरुळ येथील हवा गुणवत्ता निर्देशांक ३५३ एक्युआय आहे.

हेही वाचा- नवी मुंबई : एपीएमसीतील आगीच्या घटनेबाबतचा अहवाल सादर करण्यास विलंब?

राज्यातील हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्युआय)
चंद्रपूर १८७
बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स ३९०
नेरुळ ३५३
कोपरखैरणे २०९