ठाणे : ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, बदलापूर-अंबरनाथ, उल्हासनगर, भिवंडी-शहापूर आदी भागांतील रोटरी क्लबची वार्षिक परिषद ३ आणि ४ फेब्रुवारी रोजी नवी मुंबईतील वाशी एक्झिबिशन सेंटर येथे होणार आहे. शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून पुढील दोन दिवस विविध क्षेत्रांतील मान्यवर या परिषदेत विचार मांडणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माजी खासदार डॉ. विनय सहस्राबुध्दे, अध्यात्मिक गुरू डॉ. स्वरुपानंद सरस्वती, राम मंदिर निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावणारे टाटाचे प्रकल्प प्रमुख निलेश ताम्हाणे, परमवीरचक्र विजेते आणि कारगिल युध्दात लक्षणीय कामगिरी बजावणारे कॅ. योगेंद्र यादव, मेट्रो वुमन अश्विनी भिडे, आदित्य मोहिमेतील प्रमुख शास्त्रज्ञ निगर शाजी, वंदे भारतचे सुधांशू मणी, क्रिकेटपटू करसन घावरी, डॉ. आनंद नाडकर्णी, डॉ. जगन्नाथ दीक्षित, डॉ. उदय निरगुडकर, अतिरिक्त पोलीस महासंचालक विश्वास नांगरे-पाटील, जेनेरिक औषधांचा प्रचार करणारे अर्जुन देशपांडे, अंबा युध्दनौकेवरील पहिल्या महिला कमांडर इंदू प्रभा, जम्मू-काश्मिरचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आनंद जैन, अभिनेते मुनी झा, वास्तूशास्त्र तज्ज्ञ डॉ. रविराज अहिरराव, पर्यावरणतज्ज्ञ संतोष गोंधळेकर, आर्थिक सुरक्षातज्ज्ञ डॉ. अपूर्वा जोशी, डॉ. राधाकृष्ण पिल्ले, निवृत्त एअर चीफ मार्शल बिरेंद्रसिंग धनुआ आदी मान्यवर या परिषदेत विचार मांडणार आहेत, अशी माहिती रोटरी-३१४२चे प्रांतपाल मिलिंद कुलकर्णी यांनी दिली.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The annual conference will be held at vashi exhibition center in navi mumbai for two days amy
First published on: 01-02-2024 at 14:43 IST