scorecardresearch

Premium

नवी मुंबई मेट्रोला हिरवा कंदील, बेलापूर ते पेंधर मेट्रो मार्ग लवकरच सुरू होणार

महामुंबई तील सार्वजनिक परिवहन व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी सिडकोने एकूण ४ उन्नत मेट्रो मार्ग विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे.

navi mumbai metro project
( बेलापूर ते पेंधर मेट्रो मार्ग लवकरच सुरू)

महामुंबई क्षेत्राला आर्थिक चालना देण्यास हातभार लावणाऱ्या सिडकोच्या नवी मुंबईतील पहिल्या मेट्रो प्रकल्पातील सेंट्रल पार्क ते बेलापूर या स्थानकांदरम्यान प्रवासी वाहतूक सुरू करण्याकरिता बुधवारी मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त (सीएमआरएस) यांच्याकडून ना हरकत प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. अडीच वर्षांपूर्वी खारघर ते पेंधर या मार्गाला सी एम आर एस यांनी हिरवा झेंडा दाखवला होता पण हा मार्ग राजकीय इचछाशक्ती अभावी सूरू होऊ शकला नाही. त्यामुळे मागील अडीच वर्षात पूर्ण झालेला हा बहुप्रतिक्षित संपूर्ण ११ किलोमीटर च्या मार्गाला मेट्रो सुरक्षा आयुक्तांचे प्रमाणपत्र मिळाल्याने हा संपूर्ण मार्ग कोणत्याही क्षणी सूरू होण्याची शक्यता आहे.

सीएमआरएस प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर व्यवस्थापकीय संचालक. अनिल डिग्गीकर यांनी मार्ग क्र. १ वरील मेट्रो स्थानकांना भेट दिली. महामुंबई तील सार्वजनिक परिवहन व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी सिडकोने एकूण ४ उन्नत मेट्रो मार्ग विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांपैकी बेलापूर ते पेंधर या मार्ग क्र. १ च्या अंमलबजावणीचे काम सर्वप्रथम हाती घेण्यात आले. राज्य शासनाच्या आदेशाने रखडलेला हा प्रकल्प लवकर पूर्ण करण्यासाठी या प्रकल्पासाठी सहाय्यक म्हणून महा मेट्रोची नियुक्ती करण्यात आली आहे.

train cancelled without mega block
मुंबई: मेगाब्लॉक नसूनही लोकल रद्द
special train on Mumbai to Nagpur route
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! या मार्गावर दोन दिवस धावणार विशेष गाडी
Railway block for technical works
तांत्रिक कामांसाठी रेल्वे ब्लॉक, पुढील दोन दिवस अनेक गाड्या रद्द
jalgaon st bus stand, jalgaon old st bus stand, st mahamandal jalgaon
जळगाव शहर बससेवेचा मार्ग मोकळा, जुन्या स्थानकाची जागा देण्यास एसटीची तत्त्वतः मान्यता

हेही वाचा >>>समाजमाध्यमांवरील मैत्री बालिकेला महागात पडली

सिडकोच्या या पहिल्या मेट्रो मार्गाच्या अंमलबजावणीसाठी सिडकोला आयसीआयसीआय बँकेकडून रू. ५०० कोटींचे वित्त पुरवठा प्राप्त झाला आहे. तसेच सिडकोच्या २०२२-२३ या वर्षीच्या अर्थसंकल्पात मेट्रो प्रकल्पाकरिता समर्पित जमीन वाटप करण्याची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे प्रकल्पाचे चलनीकरण होऊन प्रकल्पासाठी वित्त पुरवठा सोपा होणारं आहे यापूर्वी ऑक्टोबर २०२१ मध्ये मार्ग क्र. १ वरील पेंधर ते सेंट्रल पार्क या ५ स्थानकांदरम्यान प्रवासी वाहतूक सुरू करण्याकरिता सीएमआरएस प्रमाणपत्र प्राप्त झाले होते. आता मार्ग क्र. १ वरील पेंधर ते बेलापूर स्थानकांदरम्यान प्रवासी वाहतूक सुरू करण्यासाठी सीएमआरएस प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. यामुळे लवकरच संपूर्ण मार्ग क्र. १ प्रवासी वाहतुकीकरिता कार्यान्वित होणार असल्याचा दावा केला जात आहे.

हेही वाचा >>>इंटरनेट सेवा खंडित झाल्याने उरणचे सेतू केंद्र बंद, विद्यार्थ्यांची शालेय दाखल्यासाठी धावपळ

नवी मुंबई मेट्रो लाईन १ च्या यशस्वी परिचालनासाठी सिडको आता सज्ज झाली आहे. परिचालनाची सर्व व्यवस्था केली असून महामेट्रोची ऑपरेटर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याचबरोबर मेट्रो प्रवासी दर निश्चित करण्यात आली असून हे दर नवी मुंबई पालिकेच्या वातानुकूलित बस सेवे पेक्षा कमी आहे. या मार्गासाठी लागणारी प्रशिक्षित कर्मचारी भरती देखील करण्यात आली आहे.

नवी मुंबई मेट्रोच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा पार झाला आहे. सीएमआरएस प्रमाणपत्र प्राप्त झाल्यामुळे नवी मुंबईकरांकरिता बेलापूर ते पेंधर मार्गिकेवर लवकरच मेट्रो सेवा सुरू होणार आहे. अनेक अडीअडचणींवर मात करून बहुप्रतीक्षित अशी नवी मुंबई मेट्रो सेवा लवकरच सुरू होणार आहे.-अनिल डिग्गीकर, व्यवस्थापकीय संचालक, सिडको

Latest Comment
View All Comments
Post Comment

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The central park to belapur route of cidco navi mumbai metro project will be launched soon amy

First published on: 21-06-2023 at 20:17 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×