scorecardresearch

नवी मुंबई महापालिकेच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी पदाचा कार्यभार मुख्य लेखा परिक्षकाकडे

गरड यांनी ऑगस्ट २०१५ पासून ३ जानेवारी २०२३ पर्यंत पालिकेच्या मुख्य व लेखा व वित्त अधिकारीपदाची जबाबदारी सांभाळली होती. त्यांची सिडकोमध्ये मुख्य वित्त व लेखा अधिकारी बदली झाली आहे.

नवी मुंबई महापालिकेच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी पदाचा कार्यभार मुख्य लेखा परिक्षकाकडे
नवी मुंबई महानगरपालिका (संग्रहित छायाचित्र)

श्रीमंत महापालिका म्हणून गौरवल्या जात असलेल्या नवी मुंबई महापालिकेच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी असलेल्या धनराज गरड यांची सिडकोच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. गरड यांनी ऑगस्ट २०१५ पासून ३ जानेवारी २०२३ पर्यंत पालिकेच्या मुख्य व लेखा व वित्त अधिकारीपदाची जबाबदारी सांभाळली होती. त्यांची सिडकोमध्ये मुख्य वित्त व लेखा अधिकारी बदली झाल्यानंतर नवी मुंबई महापालिकेच्या मुख्य व वित्त अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार नवी मुंबई महापालिकेचे मुख्य लेखा परिक्षक जितेंद्र इंगळे यांना देण्यात आला आहे.

हेही वाचा- शिष्यवृत्ती परीक्षेत नवी मुंबई महानगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

नवी मुंबई शहरात सुरु असलेले स्वच्छता अभियान तसेच विविध आर्थिक बाबी तसेच आगामी काळात येऊ घातलेला पालिकेचा अर्थसंकल्प यासाठी पालिकेच्या वित्त व लेखा विभागात प्राथमिक तयारीला सुरवात झाली आहे. आगामी काळात आर्थिक लेखाजोखाची जबाबदारी आता इंगळे यांना पार पाडावी लागणार आहे. तर दुसरीकडे सिडको महामंडळाचा आर्थिक व्यापही मोठा असून गरड यांच्याकडे सिडकोची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे सिडकोत आर्थिक शिस्त निर्माण करण्याचे काम गरड यांना करावे लागणार आहे

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-01-2023 at 19:47 IST

संबंधित बातम्या