गणेश विसर्जनावेळी विजेचा झटका लागलेल्यांपैकी एकाची प्रकृती चिंताजनक ; पनवेलमधील घटना | The condition of one of those who got electrocuted during immersion is critical amy 95 | Loksatta

गणेश विसर्जनावेळी विजेचा झटका लागलेल्यांपैकी एकाची प्रकृती चिंताजनक ; पनवेलमधील घटना

गणेश विसर्जनादरम्यान पनवेल येथील कोळीवाड्यात विसर्जन घाटावर ११ जणांना लागलेल्या विजेच्या झटक्यामुळे झालेल्या जखमींपैकी एकाची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे.

Ganesh Immersion
गणेश विसर्जनावेळी विजेचा झटका लागलेल्यांपैकी एकाची प्रकृती चिंताजनक

गणेश विसर्जनादरम्यान पनवेल येथील कोळीवाड्यात विसर्जन घाटावर ११ जणांना लागलेल्या विजेच्या झटक्यामुळे झालेल्या जखमींपैकी एकाची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे. मानस कुंभार (वय १७) असे उपचारार्थी रुग्णांचे नाव असून मानस यांच्यावर पनवेल शहरातील लाईफलाईन रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सूरु आहेत. शुक्रवारी मानस यांना झटका लागल्यापासून ते बेशुद्ध झाले होते. इतर १० जखमींपैकी उपजिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या १५ वर्षीय सर्वेम पनवेलकर याच्याही पायाला जबर जखम झाली होती. सर्वेम यांच्यावर उपचार सूरु आहेत.

हेही वाचा >>> नवी मुंबई : पालिकेला हवं आहे ३८० हेक्टर क्षेत्र

इतर नऊ रुग्णांना २४तासांच्या वैद्यकीय निरीक्षणानंतर घरी सोडणार असल्याची माहिती पनवेल पालिकेच्या प्रभारी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर रेहना मुजावर यांनी लोकसत्ताशी बोलताना दिली. या जखमींपैकी नऊ महिन्याची तनिष्का पनवेलकर या बाळाची प्रकृती चांगली असल्याचे सांगण्यात आले. जखमींना अंगदुखीचा त्रास अजूनही होत असला तरी इतर कोणत्याही जखमा झाला नसल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. ही घटना पालिकेने विसर्जन घाटावर विजेची सोय करण्यासाठी जनरेटरच्या वीजवाहिनी तुटल्यामुळे झाली होती. वेळीच एका देवदूताने विजप्रवाह सूरु असलेली पाण्यात पडलेली विजवाहिनी खेचल्याने मोठी जिवितहाणी टळल्याची चर्चा पनवेलमध्ये सर्वत्र आहे. यावेळी विसर्जन घाटावर शेकडो भावीक होते.

हेही वाचा >>> विसर्जना नंतर उरण पिरवाडी समुद्र किनाऱ्यावर स्वछता मोहीम ; दोन टेम्पो कचरा केला गोळा

ज्या पोलीस जवानांनी हजरजबाबीपणा दाखवत ही विजवाहिनी खेचली त्या देवदूत जवानाचा शोध पोलीस व पालिका घेत आहेत. या घटनास्थळावर प्रत्यक्षदर्शी त्या देवदूताचे कौतूक करत होते. शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजता दुर्घटना घडल्यावर जबर जखमींपैकी मानस यांना सुरुवातीला कोळीवाड्यातील पालिकेच्या आरोग्य केंद्रातच उपचार दिले जात होते.मात्र पालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी तातडीने धाव घेऊन मानसला पालिकेच्या वाहनातून थेट लाईफलाईन खासगी रुग्णालयात हलविल्याने मानस यांना प्राथमिक उपचार तातडीने मिळू शकले. घटनास्थळी पोलीसांनी रिक्षा व खासगी वाहनातून इतर जखमींना रुग्णालयापर्यंत पोहचविल्याने गणेशभक्त शुक्रवारी सायंकाळी या सर्वच सरकारी कर्मचा-यांच्या कर्तव्याविषयी समाधान व्यक्त करत होते.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-09-2022 at 18:18 IST
Next Story
नवी मुंबई : पालिकेला हवं आहे ३८० हेक्टर क्षेत्र