The high mast lamp at Charphata in Uran city is on navi mumbai | Loksatta

नवी मुंबई : उरणचा चारफाट्यावरील अंधाराचे जाळे फिटले; महिन्यापेक्षा अधिक काळ बंद होता हायमास्ट

सिडकोने रुंदीकरण केलेल्या चौकात चौकात हायमास्टचा दिवा लावला होता. मात्र, काही या दिव्याला अधिकृत जोडणी न मिळाल्यामुळे तो काही दिवसांतच बंद पडला होता

नवी मुंबई : उरणचा चारफाट्यावरील अंधाराचे जाळे फिटले; महिन्यापेक्षा अधिक काळ बंद होता हायमास्ट
उरण शहरातील चारफाटा येथील हायमास्ट दिवा पुन्हा एकदा सुरु

उरण शहरातील महत्वाचे ठिकाण असलेल्या चारफाटा येथील हायमास्ट मागील महिन्याभरापेक्षा अधिक काळ बंद होता. तो सोमवारी पुन्हा एकदा सुरू झाला आहे. त्यामुळं उरणमधील नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. लोकसत्ताने उरणच्या जनतेची चारफाट्यावरील अंधाराची समस्या वारंवार मांडली होती.

हेही वाचा- उरणमधील समुद्रामुळे उध्वस्त होणाऱ्या शेतीची खारभूमीकडून दखल; शेती वाचविण्यासाठी उपाययोजना करणार

उरणच प्रवेशद्वार असलेल्या चारफाट्यावरील रस्ता रुंदीकरणाचे व सुशोभीकरणाचे काम सिडकोने केले आहे. यामध्ये सिडकोने रुंदीकरण केलेल्या या चौकात हायमास्टचा दिवा लावण्यात आला होता. मात्र, या दिव्याला महावितरण कंपनीकडून अधिकृत जोडणी मिळालेली नव्हती. त्यामुळे दिवा लागल्या नंतर काही दिवसातच तो बंद झाला होता. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागत होता. याच चौकातील अंधारामुळे रात्रीच्या वेळी झालेल्या अपघातात एक २५ वर्षीय तरुणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे चौकात विजेची आवश्यकता होती. यासाठी नागरिकांकडून सिडकोकडे वारंवार मागणी करून ही दुर्लक्ष केले जात होते. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला होता. या संदर्भात सिडकोने हायमास्टचे देयका(वीज बिल)ची जबाबदारी ओएनजीसीकडे असल्याचे स्पष्ट केले होते. दरम्यान चारफाट्यावरील दिव्याची समस्या दूर होऊन सोमवारी हा दिवा पुन्हा एकदा सुरू झाल्याने येथील अनेक दिवसांचा अंधार फिटला आहे.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-12-2022 at 20:44 IST
Next Story
उरणमधील समुद्रामुळे उध्वस्त होणाऱ्या शेतीची खारभूमीकडून दखल; शेती वाचविण्यासाठी उपाययोजना करणार