The Nationalist Congress protested against the state governmentas the Airbus project also went to Gujarat | Loksatta

राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे काळी विमान उडवत गाजर दाखवत निषेध आंदोलन

गुजरात तुपाशी आणि महाराष्ट्र उपाशी अशी अवस्था या विद्यमान सरकारने करून ठेवली असल्याची टीका आंदोलनादरम्यान करण्यात आली.

Nationalist Congress protested against the state government
राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर राज्याच्या विकासात भर टाकणारे प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर सत्ताधाऱ्यांचा निषेध नवी मुंबईत करण्यात आला. फेसकॉम् नंतर आता एअरबस प्रकल्पही गुजरातला गेल्याने राज्याचा विकास आणि मोठ्या प्रमाणात मिळू शकणाऱ्या रोजगारपासून तरुण वंचित राहत आहेत. याचा निषेध नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला.

हेही वाचा- महिन्याभरात कांदा गगनाला भिडणार! सोमवारी एपीएमसीत प्रतिकिलो कांदा ३५ रुपयांवर

राज्यातील एअर बस प्रकल्पही गुजरात मध्ये जाणार असल्याने राज्यभर त्याचे पडसाद उमटत आहेत. नवी मुंबतही राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात राज्य सरकार विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प गुजरातला जात असून राज्य सरकार केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. उद्योगाचे विमान गुजरातला बेरोजगारीचे गाजर मराठी तरुणाला अशी घोषणा देत यावेळी काळी विमान उडवत गाजर दाखवत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निषेध आंदोलन केलं. गुजरात तुपाशी आणि महाराष्ट्र उपाशी अशी अवस्था या विद्यमान सरकारने करून ठेवली असून महाराष्ट्रातील रोजगार गुजरातला घेऊन जात महाराष्ट्रातील तरुणांचा रोजगार पळवण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याची टीका यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष नामदेव भगत यांनी केली आहे.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-10-2022 at 15:12 IST
Next Story
महिन्याभरात कांदा गगनाला भिडणार! सोमवारी एपीएमसीत प्रतिकिलो कांदा ३५ रुपयांवर