scorecardresearch

‘भावी पिढीसाठी निसर्ग जपून ठेवण्याची गरज’; विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांचे प्रतिपादन

गोऱ्हे म्हणाल्या, वातावरणातील बदल हे वाढत्या मानवी हस्तक्षेपामुळे होऊ लागले आहेत. त्यामुळे पुढील काळात निसर्ग शिल्लक राहणार का असा यक्ष प्रश्न उभा आहे.

‘भावी पिढीसाठी निसर्ग जपून ठेवण्याची गरज’; विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांचे प्रतिपादन
उरण एज्युकेशन सोसायटीच्या स्नेहसंमेलनात निलम गोऱ्हेंची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती

शाश्वत विज्ञान आणि विकास याचा अभ्यास व त्याची चर्चा सुरू आहे. मात्र बदलत्या परिस्थिती निसर्ग शिल्लक राहिल का असा सवाल करीत भावी पिढीसाठी निसर्ग जपून ठेवण्याची गरज असल्याचे मत विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले आहे. शुक्रवारी उरणमधील उरण एज्युकेशन सोसायटीच्या स्नेहसंमेलनात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या.

हेही वाचा- नवी मुंबई महापालिकेच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी पदाचा कार्यभार मुख्य लेखा परिक्षकाकडे

वातावरणातील बदल हे वाढत्या मानवी हस्तक्षेपामुळे होऊ लागले आहेत. त्यामुळे पुढील काळात निसर्ग शिल्लक राहणार का असा यक्ष प्रश्न उभा आहे. त्यासाठी शाश्वत विज्ञान आणि विकासाचा भविष्यातील निसर्गाचा अभ्यास सध्या मुलं करू लागली आहेत. मात्र त्यांच्यासाठी निसर्ग शिल्लक राहिला पाहिजे असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

हेही वाचा- नवी मुंबई : उरणमधील ढगाळ वातावरणाचा आंबा पिकाला फटका

त्यांनी विद्यार्थी, पालक,शिक्षक आणि समाज यांची आज काय जबाबदारी आहे. या संदर्भात आपली मते मांडली. प्रत्येक मुलं हे हुशारच असते. पालकांनी त्यांच्यावर अभ्यासाची सक्ती करू नये. त्यांची आवड निवड जाणून त्याचं शिक्षण करावे. कारण मुलं त्यांच्या परीने प्रयत्न करीतच असतात. तरीही विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित केले पाहिजे. त्याचप्रमाणे त्यांनी शाळा,महाविद्यालयातील रॅगिंग रोखण्यासाठी सरकारने आता रॅगिंग विरोधी कडक कायदा केल्याचे ही त्यांनी सांगितले. तर महाराष्ट्रात रोजगार हवा असेल तर मराठीतच बोललं पाहिजे असेही ठणकावून सांगितले.स्नेहसंमेलनात उरण एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त अध्यक्ष तसेच विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-01-2023 at 12:28 IST

संबंधित बातम्या