scorecardresearch

नवी मुंबई: अफरातफर प्रकरणी करार पद्धतीवरील लिपिकाची सेवा समाप्त

नवी मुंबई मनपाच्या आरोग्य सेवेतील करार पद्धतीवरील काम करणाऱ्या लिपिकाची सेवा समाप्त करण्यात आली आहे. अशी माहिती नवी मुंबई महापालिकेचे उपायुक्त नितिन नार्वेकर यांनी दिली.

Navi Mumbai
(संग्रहित छायाचित्र)

नवी मुंबई मनपाच्या आरोग्य सेवेतील करार पद्धतीवरील काम करणाऱ्या लिपिकाची सेवा समाप्त करण्यात आली आहे. अशी माहिती नवी मुंबई महापालिकेचे उपायुक्त नितिन नार्वेकर यांनी दिली. सेवा समाप्त केलेल्या लिपिकाचे नाव संजय मुरबाडे असे आहे. मुरबाडे हे २०१२ पासून लिपिक म्हणून करार पध्दतीवर महापालिकेमध्ये कार्यरत होते.

हेही वाचा >>>यंदा पांढऱ्या कांद्याच्या हंगामाला विलंब, दरातही घसरण

संजय मुरबाडे हे तुर्भे येथील नागरी आरोग्य केंद्र येथे कार्यरत होते. त्यांचेकडे बाह्य रुग्ण विभागातील रुग्णांना केसपेपर देणे, त्याचे शुल्क घेऊन ते प्रतिदिन विभाग कार्यालयातील लेखा विभागात भरणा करणे असे काम होते. मात्र मुरबाडे यांनी ६ महिने जमा झालेले शुल्क विभाग कार्यालयातील लेखा विभागात जमा केले नसल्याचे आढळून आले. या प्रकरणी तुर्भे नागरी आरोग्य केंद्राचे वैद्यकिय आरोग्य अधिकारी यांनी संजय मुरबाडे यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली होती.

हेही वाचा >>>पनवेल पालिकेवर जनआक्रोश मोर्चात जेष्ठांपासून चिमुरडी मुले सहभागी

तसेच त्यांच्याकडून जमा झालेले ४० हजार रुपये शुल्क वसूल करण्यात आले. त्यानंतर पदाचा दुरुपयोग करून अफरातफर केल्याने त्यांची सेवा आयुक्त राजेश नार्वेकर यांनी समाप्त करण्याचे आदेश दिले.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 13-03-2023 at 20:47 IST