नवी मुंबई पालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांची दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर राज्य शासनाने त्यांची बदली केली. त्यांच्यासह पालिकेत प्रतिनियुक्तीवर आलेले उपायुक्त डॉ बाबासाहेब रांजळे व डॉ श्री राम पवार या दोन अधिकाऱ्यांना ही शासनाने माघारी बोलविले आहे. वैद्यकीय अधिकारी असलेल्या या दोन्ही अधिकाऱ्यांना राज्यात वाढलेल्या लम्पी चर्मरोगामुळे प्राण्यांवर उपचार करण्यासाठी माघारी बोलवत असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा- उरण : बिबट्या आला रे आला….

नवी मुंबई पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन आणि सुशोभीकरणामुळे स्वछ भारत अभियान स्पर्धेत देशात तिसरा क्रमांक पटकावला आहे. त्यामागे आयुक्त बांगर व उपायुक्त रांजळे यांचे योगदान आहे. तिसरा क्रमांक मिळाल्यानंतर या दोन्ही अधिकाऱ्यांची बदली झाली आहे. बांगर यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली पसंती देऊन स्वतःच्या मतदारसंघातील पालिकेत रुजू करून घेतले आहे. राज्यातील ग्रामीण भागात गाई- बैलांना लम्पी चर्मरोगची लागण झाली आहे. अशावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमकरता भासू लागल्याने शासनाने डॉ रांजळे व डॉ पवार या

असून पशुधन आयुक्तांनी त्यांच्या बदलीचे आदेश महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम १९८१ अन्वेय जारी केले आहेत.

हेही वाचा- नवी मुंबईत वीज वितरण परवान्यासाठी ‘अदानी’चा अर्ज; महाराष्ट्रात वीज क्षेत्रात खासगीकरण पर्वाची चाहूल

पालिकेने पशु वैद्यकीय रुग्णालय सुरू करण्यासाठी शिरवणे येथे बांधकाम सुरू केले आहे. या अगोदरचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा अपघाती मृत्यू झाल्याने हे काम रखडले होते. डॉ पवार यांनी या प्रकल्पाला सुरुवात केली असताना त्यांची बदली झाल्याने आता पालिकेत पुन्हा पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची उणीव भासणार आहे.