कोपरी गावातील स्मशानभूमी आहे, त्या ठिकाणी बांधावी म्हणून ग्रामस्थांच्या वतीने मागील पाच वर्षापासून महापालिका सोबत संघर्ष सुरू होता. या संघर्षाला अखेर यश आले असून महापालिकेने या ठिकाणी नवीन स्मशनभूमी बांधण्यासाठी हालचाली सुरू केल्या असून त्याचे संकल्प चित्र तयार करण्याचे काम सुरू केले आहे,अशी माहिती महापालिका अभियंत्यांनी दिली.

हेही वाचा- नवी मुंबई : राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त ‘चमत्कारामागील विज्ञान’ व्याख्यान

onine
नाशिकमध्ये पर्यायी कांदा बाजार सुरू; तरीही शेतकऱ्यांची लूट ?
Kolhapur Police arrest gang selling fake notes
बनावट नोटांची छपाई, विक्री करणारी टोळी कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात; म्होरक्याचे नेत्यांशी लागेबांधे असल्याची चर्चा
repair work of creek bridge on uran panvel road completed
उरणच्या खाडीपूल दुरुस्तीचे काम पूर्ण; ‘हाइट गेट’ हटवण्याची प्रतीक्षा; चार गावांतील हजारो नागरिकांना दिलासा
orange cargo truck overturned at Buldhana
ट्रक उलटला; मात्र लोकांची झाली चंगळ! ग्रामस्थांनी पोते भरून…

कोपरी गावात पुरातन अशी स्मशानभूमी आहे. कालांतराने महापालिकेने १९९८-९९ साली तिची सुधारणा केली. नंतर २०१५ ला लोकप्रतिनधींच्या मागणीनुसार कोपरी गावासाठी उड्डाणपूल शेजारी स्मशाभूमी मंजूर करून ती बांधण्यात आली. मात्र उड्डाणपूल शेजारी स्मशानभूीची मागणी ही ग्रामस्थांना विश्वासात न घेता करण्यात आली. त्यामुळे ग्रामस्थ आजही गावातील जुन्या स्मशानभूमीसाठी आग्रही असून त्याच ठिकाणी अंत्यसंस्कार पार पाडले जात आहे. गावातील जुनी स्मशाभूमी हटवण्यास विरोध केला असून तसा ठराव ग्रामस्थ मंडळाने २०१८ साली एक मताने मंजूर केला आहे. तेव्हा पासून जुन्या स्मशानभूमीच्या देखभाल दुरुस्तीची मागणी करत आले आहेत. मात्र या मागणीला अखेर यश आले असून स्मशानभूमी बांधण्याच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. त्यासाठी प्रथमतः संकल्प चित्र तयार करण्यात येणार आहे ,त्यानंतर त्याची खर्चाची मंजुरी घेऊन निवीदा प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यामुळे हे काम आता प्रत्यक्षात होणार असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

हेही वाचा- टॅक्सी हेल्पलाईन गुगलवरून शोधताहेत? सावधान! खात्री करा, अन्यथा बसू शकतो आर्थिक फटका..

कोपरी गावातील स्मशानभूमी आहे त्या ठिकाणी बांधण्याची मागणी सर्व ग्रामस्थांनी ग्रामस्थ मंडळाच्या बैठकीत एक मताने केली होती. यासाठी मागील पाच वर्षापासून संघर्ष सुरू होता. त्यामुळे हे यश सर्व ग्रामस्थांचे आहे, अशी भावना कोपरी गावातील स्मशानभूमी आहे, त्या ठिकाणी बांधावी म्हणून ग्रामस्थांच्यावतीने मागील पाच वर्षापासून महापालिका सोबत संघर्ष सुरू होता. या संघर्षाला अखेर यश आले असून महापालिकेने या ठिकाणी नवीन स्मशनभूमी बांधण्यासाठी हालचाली सुरू केल्या असून त्याचे संकल्प चित्र तयार करण्याचे काम सुरू केले आहे, अशी माहिती महापालिका अभियंत्यांनी दिली.

हेही वाचा- सिमेंट विटेच्या नावाखाली गोदामात अवैध मद्यसाठा; कळंबोली लोखंड बाजारातील गोदामात ७०० खोके अवैध मद्यसाठा जप्त

कोपरी गावातील स्मशनभूमी बांधण्याचे काम प्रस्तावित आहे. त्याच्या संकल्प चित्र बनवण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे ते तयार झाल्यानंतर आयुक्तांची मंजुरी घेऊन निविदा प्रकिया राबवली जाईल, अशी माहिती नवी मुंबई महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता संजय पाटील यांनी दिली.