उरण येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेल्या उरण – पनवेल मार्गावरील नादुरुस्त खाडी पुलाचे काम दोन दिवसात सुरू होणार असल्याची माहिती सिडकोच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे येथील बोकडविरा,फुंडे,डोंगरी व पाणजे या चार गावातील नागरीकांना दिलासा मिळणार आहे. मात्र एप्रिल २०२१ मध्ये फुंडे गावाला जोडणारा खाडी पूल कोसळून त्यात एका तरुणाचा बळी गेल्या नंतर केलेल्या तपासणीत उरण पनवेल या मुख्य मार्गावरील खाडी पूल ही कमकुवत असल्याने या पुलावरील जड वाहतुकीला बंदी घालण्यासाठी बसविण्यात आलेल्या हाईट गेटमुळे १० जानेवारी २०२३ ला झालेल्या टेम्पोच्या अपघातात जखमी एका महिलेचा ही मृत्यु झाला आहे. त्यानंतर सिडकोला या पुलाच्या दुरुस्तीसाठी जाग आली आहे.

हेही वाचा >>>येत्या मंगळवारपासून नवी मुंबईकरांसाठी वॉटर टॅक्सी’ची सफर सुरू

navi mumbai illegal nursery marathi news
नवी मुंबई: कारवाईनंतरही रोपवाटिका उभी, एनआरआय परिसरात डीपीएस शाळेजवळील भूखंडावर पुन्हा अतिक्रमण
Mumbai Coastal Road, Cracks Appear, Controversy Over Traffic Flow, Pedestrian Walkway, bmc, hajiali Pedestrian subway, Pedestrian subway flood in mumbai,
मुंबई : सागरी किनारा मार्गावरील मार्गिकांच्या संख्येवरून नवा वाद, आरोपाचे अधिकाऱ्यांकडून खंडन
tank bomb shell Hinjewadi
हिंजवडीत पुलाचे काम करताना रणगाड्याचे बॉम्बशेल सापडले
Two Drunk Policemen, Vandalize Hotel, Assault Owner, hudkeshwar police station, crime, marathi news,
मद्यधुंद पोलिसांची भोजनालयात तोडफोड, चित्रफीत प्रसारित झाल्याने खळबळ

उरण – पनवेल राज्य महामार्ग क्रमांक ५४ हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात आहे. असे असले तरी उरण तालुक्यातील काही विभाग सिडकोच्या नवी मुंबई शहर विकासात मोडतो. त्यामुळे या मार्गावरील फुंडे स्थानक व सिडको कार्यालया समोरील खाडीपूल सिडकोने बांधला होता. त्यामुळे या कमकुवत पुलाची दुरुस्ती सिडकोने करावी असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे म्हणणे होते. तर पुलाच्या दुरुस्तीच्या कामासाठी हा महामार्ग सिडकोकडे वर्ग करावा असे मत सिडकोचे होते या वादामुळे मागील दोन वर्षांपासून मार्गावरील एस. टी. व एन. एम. एम. टी. या दोन्ही सार्वजनिक वाहतुकीच्या सेवा बंद झाल्या आहेत. याचा फटका चार गावातील सर्वसामान्य नागरिकांना व विशेषतः विद्यार्थ्यांना बसला आहे. नादुरुस्त पुलाच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी डी.वाय. एफ.आय., किसान सभा व जनवादी महिला संघटनेने सिडकोच्या द्रोणागिरी कार्यालयावर मोर्चा ही काढला होता. तर तातडीने पुलाची दुरुस्ती सुरू न केल्यास येत्या ८ फेब्रुवारी पासून सिडकोच्या विरोधात बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.
सिडकोने उरण – पनवेल मार्गावरील नादुरुस्त पूल दुरुस्तीची निविदा काढली असून येत्या दोन दिवसात पुलाच्या दुरूस्तीचे काम सुरू होईल. तसेच या दरम्यान या मार्गवरील हलकी वाहने ही सुरूच ठेवण्यात येणार आहेत. तर पुलाचे काम सहा महिन्यात पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती सिडकोचे कार्यकारी अभियंता हनुमंत नहाने यांनी दिली.