उरण - पनवेल महामार्गावरील नादुरुस्त पुलाचे काम सुरू होणार ; तरुण आणि महिलेच्या मृत्यू नंतर सिडकोला आली जाग | The work of the damaged bridge on the Panvel highway will begin amy 95 | Loksatta

उरण – पनवेल महामार्गावरील नादुरुस्त पुलाचे काम सुरू होणार ; तरुण आणि महिलेच्या मृत्यू नंतर सिडकोला आली जाग

उरण येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेल्या उरण – पनवेल मार्गावरील नादुरुस्त खाडी पुलाचे काम दोन दिवसात सुरू होणार असल्याची माहिती सिडकोच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

उरण – पनवेल महामार्गावरील नादुरुस्त पुलाचे काम सुरू होणार ; तरुण आणि महिलेच्या मृत्यू नंतर सिडकोला आली जाग
पनवेल महामार्गावरील नादुरुस्त पुलाचे काम सुरू होणार

उरण येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेल्या उरण – पनवेल मार्गावरील नादुरुस्त खाडी पुलाचे काम दोन दिवसात सुरू होणार असल्याची माहिती सिडकोच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे येथील बोकडविरा,फुंडे,डोंगरी व पाणजे या चार गावातील नागरीकांना दिलासा मिळणार आहे. मात्र एप्रिल २०२१ मध्ये फुंडे गावाला जोडणारा खाडी पूल कोसळून त्यात एका तरुणाचा बळी गेल्या नंतर केलेल्या तपासणीत उरण पनवेल या मुख्य मार्गावरील खाडी पूल ही कमकुवत असल्याने या पुलावरील जड वाहतुकीला बंदी घालण्यासाठी बसविण्यात आलेल्या हाईट गेटमुळे १० जानेवारी २०२३ ला झालेल्या टेम्पोच्या अपघातात जखमी एका महिलेचा ही मृत्यु झाला आहे. त्यानंतर सिडकोला या पुलाच्या दुरुस्तीसाठी जाग आली आहे.

हेही वाचा >>>येत्या मंगळवारपासून नवी मुंबईकरांसाठी वॉटर टॅक्सी’ची सफर सुरू

उरण – पनवेल राज्य महामार्ग क्रमांक ५४ हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात आहे. असे असले तरी उरण तालुक्यातील काही विभाग सिडकोच्या नवी मुंबई शहर विकासात मोडतो. त्यामुळे या मार्गावरील फुंडे स्थानक व सिडको कार्यालया समोरील खाडीपूल सिडकोने बांधला होता. त्यामुळे या कमकुवत पुलाची दुरुस्ती सिडकोने करावी असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे म्हणणे होते. तर पुलाच्या दुरुस्तीच्या कामासाठी हा महामार्ग सिडकोकडे वर्ग करावा असे मत सिडकोचे होते या वादामुळे मागील दोन वर्षांपासून मार्गावरील एस. टी. व एन. एम. एम. टी. या दोन्ही सार्वजनिक वाहतुकीच्या सेवा बंद झाल्या आहेत. याचा फटका चार गावातील सर्वसामान्य नागरिकांना व विशेषतः विद्यार्थ्यांना बसला आहे. नादुरुस्त पुलाच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी डी.वाय. एफ.आय., किसान सभा व जनवादी महिला संघटनेने सिडकोच्या द्रोणागिरी कार्यालयावर मोर्चा ही काढला होता. तर तातडीने पुलाची दुरुस्ती सुरू न केल्यास येत्या ८ फेब्रुवारी पासून सिडकोच्या विरोधात बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.
सिडकोने उरण – पनवेल मार्गावरील नादुरुस्त पूल दुरुस्तीची निविदा काढली असून येत्या दोन दिवसात पुलाच्या दुरूस्तीचे काम सुरू होईल. तसेच या दरम्यान या मार्गवरील हलकी वाहने ही सुरूच ठेवण्यात येणार आहेत. तर पुलाचे काम सहा महिन्यात पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती सिडकोचे कार्यकारी अभियंता हनुमंत नहाने यांनी दिली.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-02-2023 at 17:15 IST
Next Story
येत्या मंगळवारपासून नवी मुंबईकरांसाठी वॉटर टॅक्सी’ची सफर सुरू