पनवेल: शासकीय अध्यापक महाविद्यालयात चोरी|theft in government teachers college crime police in panvel navi mumbai | Loksatta

पनवेल: शासकीय अध्यापक महाविद्यालयात चोरी

शहरातील सार्वजनिक मालमत्ता असुरक्षित असून पोलीसांनी रात्रीच्यावेळेस गस्त वाढवावी अशी मागणी होत आहे.

पनवेल: शासकीय अध्यापक महाविद्यालयात चोरी
प्रातिनिधिक छायाचित्र /लोकसत्ता

पनवेलमध्ये भुरट्या चो-या करणाऱ्या चोरांची टोळी सक्रीय झाली असून दोन दिवासांपूर्वी शहरातील सराफाला लुटण्याचा प्रयत्न चोरट्यांकडून झाला. तसेच पालिकेच्या सार्वजनिक शौचालयातील वस्तू चोरीस जाण्याचा प्रकारही वाढला आहे. गेल्या शुक्रवारी पनवेल शहरातील महाविद्यालयातील सभागृहात चोरी झाल्याची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात सोमवारी करण्यात आली.

या चोरीमध्ये चोरट्यांनी ४ पंखे, खुर्ची, नळ व संगणकाचे यु.पी.एस यंत्र असा ८ हजार रुपयांची चोरी केल्याची माहिती या महाविद्यालयातील प्राध्यापकांनी पोलीसांना दिली आहे. सभागृहातील दरवाज्याच्या लाकडी पट्टी काढून चोरटे सभागृहात शिरले. शहरातील सार्वजनिक मालमत्ता असुरक्षित असून पोलीसांनी रात्रीच्यावेळेस गस्त वाढवावी अशी मागणी होत आहे.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-12-2022 at 14:03 IST
Next Story
उरण : करंजा बंदरातील मच्छीमार बोटीला आग; ५० लाखांचे नुकसान