सीबीडी सेक्टर नऊ येथे समोरासमोर असणाऱ्या दोन घरात चोरी करून चोरट्यांनी एक लाख १३ हजाराचा ऐवज चोरी केला. त्यात एकाच्या बँक लॉकरची किल्लीही पळवली.सीबीडी येथे राहणाऱ्या दोन शेजार्यांच्या घरात चोरी झाली असून दोन्ही कडे राहणारे हे जेष्ठ नागरिक आहेत. यातील फिर्यादी ७१ वर्षीय  उषा नयार या सीबीडी सेक्टर ९ १३ वी गल्ली घर क्रमांक २ मध्ये राहतात.त्यांच्या पतीच्या निधनानंतर एकट्याच राहतात. १४ ओगस्टला ते आपल्या एका नातेवाईकाच्या कडे हैद्राबाद येथे गेल्या. तर त्यांचे शेजारी रामदास अव्दर ५ सप्टेंबरला केरळ येथे गेले होते. २१ तारखेला त्यांना त्यांचे अजून एक शेजारी व्यंकट गंधने प्रभात फेरी मारत असताना त्यांना उषा आणि रामदास या दोघांच्या घरांच्या खिडकीची  सुरक्षा जाळी (ग्रील) तुटलेल्या अवस्थेत दिसली. त्यामुळे त्यांनी उषा यांना या बाबत कल्पना देताच त्याही तातडीने नवी मुंबईत आल्या.

हेही वाचा >>> नवी मुंबई : सुट्टीच्या दिवशीही वाहतूककोंडी पिच्छा सोडेना !!!

घरात जाऊन पहिले तर सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले होते. घरातील सामानाचे निरीक्षण केले असता १ लाख २८ हजार रुपये किमतीचे विविध पाच सोन्याचे दागिने चोरी झाले होते. धक्कादायक बाब म्हणून चोरट्यांनी उषा यांच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यातील लॉकरची किल्लीही सोबत नेली. तसेच रामदास यांच्या घरातुल ४ हजार ५०० रुपयांचे असे दोन्ही घरातून १ लाख १३ हजाराचा ऐवज चोरी झाला आहे. बंद घरात प्रवेश करून चोरीचे प्रमाणात वाढ होत असल्याने रात्र गस्त वाढीची मागणी यापूर्वीच या परिसरात करण्यात आली होती.