कामोठे वसाहतीमध्ये रविवारी मध्यरात्री भिंतीला भगदाड पाडून चोरट्यांनी सराफाचे दूकान लुटल्याची घटना घडली. सेक्टर ११ येथील वसंतबहार सोसायटीमध्ये ही घटना घडली. चोरट्यांनी लक्ष्मी ज्वेलर्स या सराफ दूकानातील तिजोरी गँस कटरच्या साह्याने तोडून १५ किलोग्रॅम चांदीचे दागिने लुटले.

नवी मुंबईतील कामोठेत भिंतीला भगदाड पाडून सराफाचे दूकान लुटले

हेही वाचा- इमारतीमध्ये वाहन उभे केल्यावरून शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून व्यापाऱ्याला मारहाण; घटना सीसीटिव्हीत कैद

मंदिरातील दानपेटी फोडली

चोरट्याने भिंतीला भगदाड पाडल्यावर तेथे मद्य पियाले. त्यानंतर प्राणवायू व गँस कटरच्या साह्याने तिजोरी कापली त्यानंतर चोरी केली. लक्ष्मी ज्वेलर्स सराफ दूकानाचे ३९ वर्षीय मालक सूरेश कुमावत यांच्या दूकानालगत असणा-या दूकानाची भिंत फोडून कुमावत यांच्या दुकानात प्रवेश केला. तर दुसरीकडे कामोठे वसाहतीमधील सेक्टर ३६ येथील आईमाता मंदीरातील दानपेटी फोडून त्यामधील २० हजार रुपयांची रोख रक्कम आणि मंदीरामधील सीसीटिव्ही कॅमेरे चोरला गेल्याचा प्रकारही उघडकीस आला आहे. दोनही घटनांमुळे कामोठे वसाहतीमधील व्यवसायिकांसह भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा- नवी मुंबई : दिघोडेत जलवाहिनी फुटून नुकसान; दोन वर्ष झाले तरी नुकसान भरपाई नाही, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्याचा आंदोलनाचा पवित्रा

पोलिसांची रात्रीची गस्त कमी झाल्यामुळे चोरीचे प्रमाण वाढले

काही दिवसांपूर्वी खारघरमधील मंदीरात सुद्धा चोरट्यांनी दानपेटी फोडली होती. नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह यांनी नूकतेच आय.एसय.ओ. नामांकन प्राप्त झाल्याने कामोठे पोलिसांचे कौतुक केले होते. पोलिसांची रात्रपाळीतील गस्त कमी होत असल्याने चो-यांचे प्रमाण वाढत असल्याचे व्यापारी वर्गाचे मत आहे.