स्वच्छ सर्वेक्षण २०२३” अंतर्गत ‘माझं शहर – माझा सहभाग’ या उद्दिष्ट पूर्तीच्या दृष्टीने नागरिकांच्या सहभागावर महापालिका विशेष भर देत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवते. वाशी येथे स्वर्यंस्फूर्तीने नागरीकांनी स्वच्छताकर्मीच्या हातातील झाडून घेत हजारो नागरीकांनी स्वच्छ अभियानात वेगळेपण दाखवून दिले . परंतू दुसरीकडे पालिकेनेच सुरु केलेल्या नको असलेल्या वस्तू हवे असलेल्यापर्यंत पोहचवण्यासाठीच्या संकल्पनेचा पुरता बोऱ्या उडाला असून ही संकल्पना स्वच्छ शहर सर्वेक्षणाला बाधा ठरत असल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे पालिकेने या संकल्पनेबाबतच पुनर्विचार करण्याची आवश्यकता आहे.

हेही वाचा- नवी मुंबई : मलनिस्सारण पाण्यावर प्रक्रिया करून आद्योगिक वसाहत आणि उद्यान विभागाला देणार; पिण्याच्या पाण्याची बचत स्वच्छता कामगारांचा झाडू स्वयंस्फुर्तीने नवी मुंबईकरांच्या हाती..

Difficulties in the redevelopment of redeveloped buildings
मुंबई : पुनर्विकसित इमारतींच्या पुनर्विकासात अडचणी!
CIDCO lottery winners, possession of home
दोन वर्षांपासून ताबा न मिळालेले लाभार्थी सिडकोच्या दारी
Municipal Corporation ignoring quakes in navi mumbai delayed in making rule for builders
नवी मुंबई : हादऱ्यांच्या मालिकेकडे महापालिकेचा काणाडोळा, बिल्डरांच्या सोयीसाठी नव्या नियमावलीला मुहूर्त सापडेना
Nagpur RTO has succeeded in getting 90 percent revenue compared to target given by government
नागपूर ‘आरटीओ’ मालामाल! गेल्यावर्षीच्या तुलनेत…

नागरिकांकडून बरेचदा रोजच्या ओल्या व सुक्या कच-यासोबत जुन्या वस्तूदेखील कच-यामध्ये दिल्या जातात. यामधील अनेक वस्तू पुन्हा वापरात आणल्या जाऊ शकतात. अशा वस्तूंचा पुनर्वापर व्हावा व दैनंदिन कच-याचे प्रमाण कमी व्हावे यादृष्टीने महापालिकेने विविध प्रभागात ‘थ्री आर’ आहेत.या अर्थात कचरा निर्मितीत घट (Reduce), टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर (Reuse) व कच-यावर पुनर्प्रक्रिया (Recycle) या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात विविध विभागांमध्ये ठिकठिकाणी वैशिष्ट्यपूर्ण स्टॅण्ड उभे करण्यात आलेले आहेत.या स्टँडमध्ये विविध प्रकारच्या वस्तू ठेवण्यासाठी विशिष्ट कप्पे तयार करण्यात आलेले असून नागरिकांनी त्यांच्या वापरात नसलेले मात्र वापर केला जाऊ शकतो असे चांगल्या प्रकारचे दैनंदिन वापरातील कपडे, चपला व बूट, भांडी, खेळणी, चादर, ब्लॅंकेट अशा प्रकारच्या विविध वस्तू या स्टँण्डमध्ये आणून ठेवल्यास त्या तेथून गरजूंना आपल्या वापरासाठी घेऊन जाणे व वापरात आणणे शक्य होईल अशी या उपक्रमाची मूळ संकल्पना आहे.

हेही वाचा- स्वच्छता कामगारांचा झाडू स्वयंस्फुर्तीने नवी मुंबईकरांच्या हाती..

पालिकेने नको असेल ते द्या आणि हवे असेल ते घ्या’ असा हा अभिनव उपक्रम राबवताना सुक्या कच-याचे प्रमाण कमी होऊन ती कच-यात टाकली जाणारी वस्तू पुन्हा वापरात येणार असल्याने ज्यांना या वस्तूंची गरज आहे अशा व्यक्तींना त्याची मदत होईल शिवाय ती वस्तू बनविण्यासाठी लागणा-या साधनांचीही बचत होईल असा उद्देश ठेवला होता. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने बेलापूर ते दिघा या क्षेत्रात ३५ ठिकाणी हे स्टँड ठेवण्यात आले आहेत.परंतू हा उप्रकम पालिकेच्या स्वच्छता अभियाना बाधा ठरत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या स्टॅन्डमध्ये नागरीक नको असलेल्या पण वापरात येऊ शकणाऱ्या वस्तू ठेवल्या जातात परंतू या ठेवलेल्या वस्तू अस्ताव्यस्त अवस्थेत पडलेल्या बघायला मिळतात. त्यामुळे अशा या पालिकेच्या अभिनव उपक्रमाभोवती भिकारी नागरीकांचा वावर वाढला असून त्याची लहानमुले या वस्तूभोवती खेळताना पाहायला मिळतात. त्यामुळे या वस्तू त्या आकर्षक स्टॅन्डपेक्षा पदपथावर अस्ताव्यस्त पडलेल्या पाहायला मिळतात. त्यामुळे पालिकेचा उद्देश बाजूला राहीला असून याच स्टॅन्डमध्ये भिकाऱ्यांची छोटी मुलेही झोपवली जात असल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे पालिकेने या उपक्रमाबाबत नक्कीच पुनर्विचार करण्याची आवश्यकता आहे. शहरात काही ठिकाणी अशाच प्रकारे माणूसकीची भित उपक्रम राबवला होता. त्याठिकाणीही अशीच दुरावस्था झाल्याचे चित्र पाहायला मिळत होते. त्यामुळे पालिकेच्या उपक्रमाबाबत सर्वसामान्य नागरीकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

नवी मुंबई महापालिकेत असलेल्या ८ विभाग कार्यालयांकडे संबंधित उपक्रमाच्या देखभालीची जबाबदारी देण्यात आलेली आहे. परंतू हा उपक्रम स्वच्छतेला बाधा ठरत असल्याचे चित्र आहे. याबाबत नवी मुंबईतील नागरीक दिनेश चव्हाण यांनी सांगीतले की स्वच्छतेता बाधा येत असून असे उपक्रम राबवताना योग्य पध्दतीने त्याची देखभाल करण्याची पालिकेची जबाबदारी आहे. अन्यथा स्वच्छतेला मारक व विद्रुपीकरण होत असल्याने या उपक्रमाबाबत पालिकेने पुर्नविचार करण्याची आवश्यकता आहे.

हेही वाचा- नवी मुंबई : आगीपासून सर्वांना वाचवले आणि स्वतः दुर्दैवाने आगीच्या भक्षस्थानी

चौकट- हे स्टँड ज्या भागात ठेवलेले आहेत त्या भागातील सफाई कामगारांच्या पर्यवेक्षकाकडून या स्टँडमधील साहित्याची काळजी घेणे आवश्यक आहे.येथे ठेवण्यात आलेले कपडे, पुस्तके, चपला, बूट, भांडी, खेळणी व इतर वस्तूंच्या विशिष्ट कप्प्यात त्या त्या वस्तू ठेवल्या जात असल्याबाबत लक्ष दिले गेले पाहीजे.परंतू वस्तू पदपथावर पडलेल्या पाहायला मिळतात.दररोज पर्यवेक्षक त्यांची पाहणी करून योग्य कप्प्यात योग्य वस्तू ठेवली जाईल याबाबत काळजी घेण्याची गरज आहे,परंतू माणूसकीचे दर्शन घडविणारा हा अभिनव उपक्रम अडचणीचा ठरु लागला आहे.

पालिकेने एका चांगल्या उद्देशाने हा उपक्रम सुरु केला आहे. आपल्याला नको असलेल्या वस्तू ज्यांना हव्या आहेत त्यांना मिळतील असा उद्देश या उपक्रमामागील असून संबंधित जबाबदारी असलेल्या महापालिका विभाग कार्यालयामार्फत याबाबत योग्य खबरदारी घेण्याविषयी सूचना देण्यात येतील. स्वच्छतेला कोणतीही बाधा होणार नाही याबाबत काळजी घेण्याचे निर्देश देण्यात येतील, अशी माहिती घनकचरा व व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांनी दिली.