नवी मुंबई : वाशी गणेश विसर्जन तलावात संध्या सव्वादोन हजार किलोमीटरचा प्रवास करून तिबेटीयन गल हे पक्षी आले आहेत. हजारोंच्या संख्येने  या पक्ष्यांच्या थव्यांनी सर्वाचे लक्ष वेधले आहे. पाण्यात शेकडो पक्षी एकत्र डुंबण्याचा आनंद घेतानाचे नयनरम्य दृश्य दिसते. नवी मुंबई ‘फ्लेमिंगो सिटी’ म्हणून उदयास येत असली तरी येथे सध्या मोठय़ा प्रमाणावर तिबेटीयन गल या स्थलांतरित पक्ष्यांचे थवे लक्ष वेधून घेत आहेत. शहरातील वाशी-कोपरखैरणे तलावात मुक्त विहार करीत आहेत. हे पक्षी मूलत: तिबेटमधील असून हिवाळय़ात प्रजनन काळात लाखोंच्या संख्येने लडाख ते मंगोलिया परिसरात प्रजनन काळ संपवून ते भारतीय उपखंडात खासकरून खाडी किनाऱ्यांच्या गावात येतात.

हिवाळय़ाच्या सुरुवातीला तब्बल सव्वादोन हजार किलोमीटरचा प्रवास करून हे पक्षी सध्या नवी मुंबईत अनेक ठिकाणी हजारोंच्या संख्येने दिसून येत आहेत. कबुतराप्रमाणे दिसणारे हे पक्षी सुरुवातीला कबुतरे वाटतात. मात्र शरीर पूर्ण पांढरे आणि डोके तपकिरी रंगाचे असते. पाण्यात मनसोक्त डुंबणे, आकाशात विहार करणे, पाण्यातील छोटे मासे-किडे खाणे हाच दिनक्रम या पक्ष्यांचा असतो. एप्रिलदरम्यान हे सर्व पक्षी पुन्हा तिबेटमध्ये निघून जातात. आताही या पक्ष्यांचा विहार पाहता येतो.

Video Of Baby Turtles Making Their First Voyage Will Give You Goosebumps
Video : डायनासोरच्या काळापासून अस्तित्वात आहे ही कासवांची प्रजाती, चिमुकल्या कासवांचा पहिला समुद्र प्रवास एकदा बघाच
heavy traffic on manor wada bhiwandi state highway closed due to crack in bridge near manor
पालघर: मनोर वाडा अवजड वाहतूक बंद; टेन जवळील पुलाच्या सुरक्षिततेबद्दल शंका
satpura range marathi news, bhongarya bazar marathi news
सातपुडा पायथ्याशी होळीआधी भोंगर्‍या बाजारात ढोलचा निनाद!
Development of six villages
बीकेसीच्या धर्तीवर मढ, मार्वेसह सहा गावांचा विकास लांबणीवर?

हे तिबेटीयन गल पक्ष्यांचे थवे असून तिबेट भागात सर्वाधिक आढळतात. हिवाळय़ात तिबेट पठार ओलांडून लडाख ते मंगोलियापर्यंत प्रजनन करतात आणि भारतीय उपखंडात येतात.

– निखिल भोपळे, पक्षी निरीक्षक