एकाच घरातील तीन वृद्धांनी विष प्राशन करून संपवलं जीवन

एकाच घरातील तिघांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

maulii

नवी मुंबईतील वाशी येथे एकाच घरातील तिघांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वाशी सेक्टर ४ येथील माऊली सोसायटी मध्ये राहणाऱ्या मोहिनी कामवानी (वय ८७), कांता कामवानी (वय ६३) व दिलीप कामवानी (वय ६७)  अशी तिघांची नावे आहेत. या तिघांनी विष प्राशन करून आत्महत्या केली आहे.

मृत तिघांमध्ये मोहिनी कामवानी आई, दिलीप कामवानी मुलगा व कांता कामवानी मुलगी यांचा समावेश आहे. २९ ऑक्टोबरला सकाळी त्यांनी विष प्राशन केले होते. यासंदर्भातील माहीती वाशी पोलिसांना मिळताच त्यांनी तात्काळ तिघांनाही मनपा रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारा दरम्यान तिघांचाही मृत्यू झाला. मागील काही दिवसांपासून आर्थिक अडचणीमुळे कामवानी कुटुंबीय नैराश्येत होते. या नैराश्यामुळेच त्यांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

दरम्यान, या तिघांचेही नातेवाईक नाशिकमध्ये राहत असल्याची माहिती मिळत आहे. त्यांच्याशी संपर्क करून मृतदेह नातेवाईकांना सोपवण्यात येईल, अशी माहिती वाशीचे पोलीस निरिक्षक प्रमोद तोरडमल यांनी दिली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नवी मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Three old age from the same family ended their lives by consuming poison in navi mumbai hrc

ताज्या बातम्या