बाळाच्या आईला ९५ हजार तर मध्यस्थ डॉक्टरला दोन लाख ; कामोठे बाळविक्रीप्रकरणी आरोपींना पोलीस कोठडी

कामोठे पोलीस ठाण्यातील साहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश महाला यांच्या पथकाने हे प्रकरण उघडकीस आणले.

पनवेल : एका पाच वर्षांच्या बाळाच्या विक्रीचा प्रयत्न कामोठे पोलिसांनी पाच दिवसांपूर्वी हाणून पाडला असून यातील मध्यस्थी डॉक्टरसह तीन जणांना पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या प्रकरणात बाळाच्या आईला ९५ हजार तर मध्यस्थ डॉक्टरला दोन लाख रुपये मिळणाार होते.

मुंबई येथील नालासोपारा येथून तळोजा वसाहतीमध्ये राहण्यासाठी आलेल्या २८ वर्षीय एका महिलेला पाच मुले आहेत. दोन मोठी मुले भायखळा येथील मदरशामध्ये असून तिच्यासोबत दोन मुली आणि एक मुलगा तळोजात राहतात. अडीच महिन्यांची आणखी एक मुलगी तिला नुकतीच झाली होती. संबंधित महिलेचा पती तिच्यासोबत राहत नसल्याने ती आर्थिक विवंचनेत होती.

कामोठे पोलीस ठाण्यातील साहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश महाला यांच्या पथकाने हे प्रकरण उघडकीस आणले. कामोठे येथील सेक्टर ८ मध्ये ‘फॅमिली हेल्थ केअर’ या नावाने डॉक्टर पंकज पाटील हे परिसरात सराव करतात. यांच्याकडे एक बाळाची विक्री होत असल्याची माहिती पोलीस अधिकारी महाला यांना समजल्यावर त्यांनी राजस्थानी पालकाचा बनाव करून एक कुटुंब डॉक्टर पाटील यांच्याकडे पाठविले. डॉ. पाटील यांच्यासोबत बनावट पालकांचे सर्व झालेल्या संवादाची पोलिसांनी खात्री पटल्यानंतर बाळ खरेदीसाठी चार लाख रुपयांची रक्कम ठरविण्यात आली. पोलिसांनी रकमेची तरतूद केली. या रकमेच्या बंडलांमध्ये काही बनावट नोटांचा वापर करण्यात आला. अखेर ठरल्याप्रमाणे रक्कम स्वीकारल्यानंतर पोलिसांनी या चौकडीला अटक केली. न्यायालयाने या चौघांनाही पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. मंगळवारी कोठडीची मुदत संपल्यावर या चौघांना पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहेत.

कोठडीत डॉक्टर पाटील यांनी व त्यांच्यासह अटक असणाऱ्या महिलांनी काही धक्कादायक खुलासे केले आहेत. यामध्ये चार लाखांच्या विक्रीमध्ये बाळाच्या आईला ९५ हजार मिळणार होते. तसेच बाळाची खरेदी विक्री करण्यासाठी पोलिसांनी बनावट एजंट नेमलेल्या व्यक्तीला २० हजार रुपये आणि अटकेत असणाऱ्या रुखसार नदीन शेख (२९) आणि रजनी पांडुरंग जाधव (३२) यांना प्रत्येकी ४० हजार रुपये मिळणार होते.

बाळाच्या ताब्याविषयी मार्गदर्शन

सध्या या प्रकरणातील पीडित अडीच महिन्यांचे बाळ त्याच्या आईसोबत आहे. कामोठे पोलिसांनी या बाळाच्या ताब्याविषयी बालक कल्याणकारी विभागाकडे मार्गदर्शन मागीतले होते. या विभागाने बाळ हे आईच्या दुधावरच असल्याने त्याला आईसोबत ठेवण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत. बालक दत्तक योजनेच्या कार्यपद्धतीमध्ये सरकारी पद्धत न अवलंब करता थेट विकणारे व खरेदी करणारे पालक असा रोख्यांच्या व्यवहार झाल्याने अनेक वर्षांंचे वैद्यकीय शिक्षण घेऊन दवाखाना नावारूपाला आणणारे डॉक्टर पाटील हे कोठडीत मी यापूर्वी असे कधीच केले नसल्याचा पश्चात्ताप व्यक्त करत असल्याची माहिती कामोठे पोलिसांनी दिली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नवी मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Three people including doctor get police custody in child trafficking case zws

Next Story
उरणमध्ये कामगारांचा मोर्चा
ताज्या बातम्या