scorecardresearch

नवी मुंबई: पिरवाडी किनाऱ्यावर पर्यटकांची मांदियाळी; नव वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची गर्दी

रणमधील स्थानिक पर्यटकांसह मुंबई, ठाणे, नवी मुंबई तसेच रायगडमधील पर्यटकांनी या समुद्रकिनारी गर्दी केली आहे. एक दिवसाच्या पर्यटनासाठी नागरिक पिरवाडी व केगाव या दोन किनाऱ्यांना पसंती देतात.

नवी मुंबई: पिरवाडी किनाऱ्यावर पर्यटकांची मांदियाळी; नव वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची गर्दी
पिरवाडी किनाऱ्यावर पर्यटकांची मांदियाळी

शनिवारी सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी उरणच्या पिरवाडी किनाऱ्यावर पर्यटकांनी गर्दी केली आहे. उरणमधील पिरवाडी किनारा हा पर्यटकांसाठी एक ठिकाण आहे. या किनाऱ्यावर उरणमधील स्थानिक पर्यटकांसह मुंबई, ठाणे, नवी मुंबई तसेच रायगडमधील पर्यटक येत असतात. पर्यटकांसाठी एक दिवसाच्या पिरवाडी व केगाव या दोन किनाऱ्यांना पर्यटक पसंती देतात. त्यामुळे उरणच्या पिरवाडी किनाऱ्यावर मोठ्या संख्याने पर्यटकांनी गर्दी केली होती.

हेही वाचा- पुढील एक वर्षासाठी गरिबांना मोफत धान्य मिळणार

पिरवाडी परिसरात सध्या घरगुती जेवण, नाश्ता आदींची व्यवस्था तसेच मुलांसाठी करमणुक व खेळण्यांची ही व्यवस्था आहे. तर दुसरीकडे नवीन हॉटेल तयार झाले असून या ठिकाणी वस्तीची ही व्यवस्था आहे. हे हॉटेल्स ही फुल्ल झाली आहेत. त्यामुळे यावर्षी नवं वर्षाच्या स्वागतासाठी पिरवाडी किनाऱ्यावर पर्यटकांनी गर्दी केली आहे.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-12-2022 at 18:30 IST

संबंधित बातम्या