लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उरण: येथील जेएनपीटी बंदराच्या कामगार वसाहतीत असलेल्या रुग्णालयाचे खाजगीकरण करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने केला आहे. त्यासाठी वर्तमानपतत्रात जाहिरात देण्यात आली आहे. जेएनपीटीच्या रुग्णालय खाजगीकरणाला कामगार संघटना आणि स्थानिक प्रकल्पग्रस्तांचा विरोध आहे. यासाठी कामगार संघटनानी विरोधात आंदोलन सुरू केले आहे.

जेएनपीटी बंदरातील कामगार व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबातील व्यक्तींसाठी हे रुग्णालय सेवा देत आहे. तर अपघातात जखमींवर तातडीने उपचार करण्यासाठी ही या रुग्णालयात ट्रॉमा केअर विभागाची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. तर जेएनपीटी परिसरातील नागरीकांना ही या रुग्णालयाचा अपघात व इमर्जन्सी मध्ये उपयोग होत आहे. त्यामुळे या रुग्णालयात जेएनपीटी प्रकल्पग्रस्त व स्थानिकांना मोफत उपचार देण्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र त्याचवेळी जेएनपीटी प्रशासनाने या रुग्णालयाचे खाजगीकरण करून ते रुग्णालय शंभर खाटांचे करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे.

आणखी वाचा- हेल्मेटचा बेल्ट न बांधणे पडले महागात, अपघातात मृत्यू

उरण मध्ये जेएनपीटी रुग्णालयाचा विस्तार करीत आहे. त्याचे स्वागतच आहे. उरण मध्ये देशातील मोठं मोठे प्रकल्प असूनही नागरिकांसाठी पुरेशी रुग्णसेवा उपलब्ध नाही. त्यामुळे उरणच्या नागरीकांना मुंबई, नवी मुंबई तसेच पनवेल येथे जाऊन उपचार घ्यावे लागत आहेत. त्यामुळे जेएनपीटी ने सामाजिक जबाबदारी म्हणून उरणच्या नागरिकांसाठी आरोग्य सेवा उपलब्ध करावी अशी मागणी उरणच्या नागरिकांकडून केली जात आहे.

उरणच्या उपजिल्हा रुग्णालयाची प्रतीक्षा

उरणकारांसाठी शासनाने १२ वर्षांपूर्वी उपजिल्हा रुग्णालय घोषित केले आहे. या रुग्णालयाची एक तपापासून प्रतीक्षा आहे. मात्र अनेकदा आश्वासन देऊनही उरणचे उपजिल्हा रुग्णालयाची प्रतीक्षा कायम आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Trade unions and local project victims oppose privatization of jnpt hospital mrj
First published on: 19-03-2023 at 15:35 IST