नवी मुंबईतील डॉ डीवाय पाटील क्रिकेट मैदानावर महिला आयपीएलचा थरार सुरु होणार आहे. त्यामुळे सायन पनवेल मार्गावर नवी मुंबईत प्रचंड वाहतूक कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेता वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. मुळात या मार्गावर नियमितच वाहतूक प्रचंड असते त्यामुळे वाहतूक कोंडी होऊ न देण्यास आयपीएल मुळे वाहतूक पोलिसांचा कस लागणार आहे.

मार्च मध्ये ११ महिला आयपीएल सामने नवी मुंबईतील डॉ डी.वाय. पाटील मैदानात खेळवले जाणार आहेत. हे सामने ०४, ०५, ०७, ०९, ११, १३, १५, १८, २०, २१ व २४ मार्च २०२३ या दिवशी खेळविले जाणार आहेत.या दिवशी स्टेडियमला येणारे खेळाडू व महत्वांच्या व्यक्तींचा जाण्याचा व येण्याचा मार्ग स्टेडियम नजिकच्या भिमाशंकर सोसायटी ते एल. पी. रिक्षा स्टॅण्ड या दरम्यानच्या सर्व्हिस रोड (सेवा रस्ता) हा निश्चित करण्यात आला आहे. सदर सर्व्हिस रोडवर सुरक्षेच्या कारणास्तव व वाहतुक कोंडी होवू नये याकरीता नागरिकांच्या वाहनांना ये-जा करण्यास व वाहने पार्किंग करण्यास मनाई करणे बाबत तसेच सदर अधिसूचनेतून अत्यावश्यक सेवेची वाहने, पोलीस, फायरब्रिगेड, ॲम्बुलन्स, आयपीएल व्यवस्थापनाचे अधिकृत पास धारक वाहने यांना सूट देणेबाबत अधिसूचना निर्गमित करणे बाबत अहवाल नुकताच सादर करण्यात आला आहे.
मार्च मधील  ०४, ०५, ०७, ०९, ११, १३, १५, १८, २०, २१ व २४ मार्च २०२३ या दिवशी सकाळी ०७:०० ते रात्री २४:०० वा. पर्यंत डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियम नजिकचा भिमाशंकर सोसायटी ते एल. पी. रिक्षा स्टॅण्ड या दरम्यानच्या सर्व्हिस रोडवर वाहनांना ये-जा करण्यास व वाहने पार्किंग करण्यास मनाई करण्यात येत आहे.याला पर्यायी मार्ग- म्हणून वाहन चालक  सायन-पनवेल हायवे रोडवरील उरण फाटा ते एल. पी. ब्रिज दरम्यानचा रस्ता वापरून इच्छित स्थळी जातील.

Indian Premier League Cricket Mumbai vs Chennai ipl 2024 match sport news
इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट: मुंबई-चेन्नई आमनेसामने! पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांत आज वानखेडेवर होणाऱ्या द्वंद्वात धोनीवर लक्ष
rohit sharma virat kohli
ipl 2024, MI vs RCB: इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट: सलग दुसऱ्या विजयाचे लक्ष्य! मुंबई इंडियन्ससमोर आज वानखेडेवर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुचे आव्हान
IPL 2024 MI vs RR Predicted Playing 11 Pitch Report details in Marathi
MI vs RR Match Preview: मुंबईसमोर राजस्थानचे आव्हान, MI च्या संघात कोणते बदल होणार? पाहा दोन्ही संघांची संभाव्य प्लेईंग इलेव्हन
nagpur ipl betting marathi news, mahadev app ipl betting marathi news
कोट्यवधींची उलाढाल! ‘आयपीएल’वर सट्टा अन् बनावट महादेव ॲप…

अशी अधिसूचना काढण्यात आली आहे मात्र या  अधिसूचनेतून अत्यावश्यक सेवेची वाहने, पोलीस, फायरब्रिगेड, ॲम्बुलन्स, आयपीएल व्यवस्थापनाचे अधिकृत पास धारक वाहने यांना सूट देण्यात येत आहे.अशी माहिती वाहतूक पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांनी दिली आहे.