scorecardresearch

Premium

कळंबोलीतील कपास महामंडळ गोदामालगत अवजड वाहनांच्या बेकायदेशीर पार्किंगमुळे परिसरात वाहतूक कोंडी

वाहतूक नियमन करणा-या पोलीसांच्या देखत हा सर्व प्रकार सूरु असल्याने नेमके पोलीस करतात काय, असा प्रश्न यानिमित्ताने विचारला जात आहे. 

traffic congestion area illegal parking heavy vehicles Kalamboli panvel
कळंबोलीतील कपास महामंडळ गोदामालगत अवजड वाहनांच्या बेकायदेशीर पार्किंगमुळे परिसरात वाहतूक कोंडी (छायाचित्र- लोकसत्ता टीम)

पनवेल: कळंबोली वाहतूक शाखेच्या पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असणा-या कपास महामंडळाच्या गोदामालगतच्या सेवा रस्त्यावर सिमेंट वाहतूक करणा-या ट्रकची बेकायदा दुहेरी रांगा लागत असल्याने या परिसरात वाहतूक कोंडीचा सामना सतत इतर वाहनातील प्रवाशांना करावा लागतो. वाहतूक नियमन करणा-या पोलीसांच्या देखत हा सर्व प्रकार सूरु असल्याने नेमके पोलीस करतात काय, असा प्रश्न यानिमित्ताने विचारला जात आहे. 

कळंबोली लोखंड बाजार ते कळंबोली सर्कल या दरम्यान सेवा रस्त्यावर ही वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. कपास महामंडळ, धान्य साठवणूकीचे कोठार (एफ.सी.आय.), सी.सी.डब्ल्यूचे गोदाम अशी मोठी गोदामे या सेवा रस्त्यालगत आहेत. या सेवा रस्त्याचा वापर अवजड वाहने उभी करण्यासाठी चालकांकडून केला जातो. मात्र एकावेळेस एक ट्रक उभ्या करण्याची संधी मिळाल्याने ट्रकचालक एकावेळी दोन ते तीन ट्रक एकाबाजूला एक उभे कऱतात. त्यामुळे ३० फुटी रुंदीचा सेवा रस्ता १० फूटी होतो. यापूर्वी या रस्त्यावर अशाचप्रकारे ट्रक उभे केले जात असल्याने कळंबोली वाहतूक शाखेचे तत्कालिन वरिष्ठ पोलीस निरिक्षक निशिकांत विश्वकार यांच्या कारकिर्दीत कळंबोली वाहतूक शाखेच्या पोलीसांनी वाहनांवर दंडात्मक आणि फौजदारी गुन्हे दाखल करण्याची कारवाई सातत्याने केली. या कारवाईमुळे ट्रकचालकांना काही प्रमाणात शिस्त लागली होती.

rohit pawar
‘रोहित पवार यांच्या बारामती अ‍ॅग्रोकडून नियमांचे उल्लंघन’; अंतरिम दिलासा रद्द करण्याची एमपीसीबीची मागणी
Anil-deshmukh
कंत्राटी भरती करणाऱ्या कंपन्या भाजप नेत्यांच्या, अनिल देशमुख म्हणाले ‘जातनिहाय सर्वेक्षण…’
liqur
मद्यप्रेमींच्या खिशावर भार; ‘हे ’ ब्रॅण्ड महागणार
government job office
शासकीय नोकरीच्या स्वप्नावर पाणी!; बाह्ययंत्रणेद्वारे महत्त्वाच्या पदांवर मनुष्यबळ भरतीचा निर्णय

हेही वाचा… पनवेल: पर्यावरण रक्षणासाठी रात्रपाळीत दिडशे पालिका कर्मचा-यांचे काम

मात्र वरिष्ठ पोलीस निरिक्षक विश्वकार यांच्या बदलीनंतर पोलीसांची कारवाई थंडावल्याने पुन्हा ट्रकचालक कपास महामंडळ ते सीडब्ल्यूसी या गोदामाच्या प्रवेशव्दारापर्यंत दोन ते तीन रांगेत ट्रक उभे करतात. यामुळे कळंबोली सर्कलकडे जाणा-या सेवा रस्त्यावर वाहतूक कोंडीचा सामना नेहमी करावा लागतो. याबाबत कळंबोली वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक हरिभाऊ बानकर यांना विचारले असता त्यांनी लोखंड बाजारातील अंतर्गत सेवा रस्त्यांवर जानेवारी ते २२ सप्टेंबरपर्यंत वाहतूक पोलीसांनी ११ हजार ८८३ चालकांवर दंडात्मक कार्यवाही केल्याची माहिती दिली. तसेच वेळोवेळी लोखंड बाजारातील वाहतूकदार, व्यापारी यांच्या बैठका घेऊन त्यांना सुद्धा याविषयी रहदारीस अडथळा करु नये अशा सूचना दिल्या मात्र शेकडो वाहन व चालकांवर कारवाई करुनही शिस्त पाळली जात नसल्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक बानकर यांनी सांगीतले. यापूढे वाहतूक पोलीस विभाग नियमभंग करणा-या चालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करणार असल्याचा इशारा पोलीस अधिकारी बानकर यांनी दिला.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Traffic congestion in the area due to illegal parking of heavy vehicles in kalamboli panvel dvr

First published on: 22-09-2023 at 12:26 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×