शासकीय कार्यालयांना शनिवारी व रविवारी दोन दिवस सुट्टी असते. सोमवार ते शुक्रवार सतत वाहतूकोंडीमुळे हैराण होणाऱ्या प्रवाशांना सायन पनवेल महामार्गावर व वाशी टोलनाक्यावर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.सुट्टीचा आनंद घेण्यासाठी मुंबईबाहेर जाणाऱ्या प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावाच लागतो .पण आठवडाभरात शनिवारी कामानिमित्त तसेच नातेवाईकांकडे जाणाऱ्या नागरिकांनाही सर्वत्र आढळणारी वाहतूक कोंडी पिच्छा सोडत नसल्याचे चित्र आज महामार्गावर पाहायला मिळाले.आज दुपारनंतर मुंबईहून पुण्याच्या दिशेने मोठ्या प्रमाणात वाहने जात असल्यामुळे वाशी उड्डाणपुलावर वाहनांची गर्दी होती परंतु दुसरीकडे पनवेलहून सायन जाण्याच्या मार्गावरही वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> हिरव्या वाटाण्याचे दर कडाडले! किरकोळ व्यापाऱ्यांसह गृहिणींची वाटाण्याकडे पाठ

त्यातच दुपारनंतर पावसाची रिपरिप सुरु असल्यामुळं मानखुर्द पासून वाशी टोलनाक्यावर दुतर्फा वाहनांची गर्दीमुळे अनेकांना या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. पावसामुळे उड्डाणपुलावर वाहतूक संथगतीने सुरु आहे. मानखुर्द ते वाशी टोननाक्यावर वाहनांची प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्याने वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे. महामार्गावर दररोज सोमवार ते शुक्रवार वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असून सुट्टीच्या दिवशी कामानिमित्त बाहेर पडावे तर नेहमीच असते वाहतूककोडी असा अनुभव येत असल्याची माहिती ओमकार सावंत या प्रवाशाने दिली. नवी मुंबई वाहतूक विभागामार्फत वाहतूककोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलीस सज्ज असून काही मिनिटांच्या प्रवासासाठी सुट्टीच्या दिवशी तासभर लागत असल्याने नको रे बाबा रस्त्याने प्रवास अशी खंत महिला प्रवाशी योगिनी सानप य महिला प्रवाशाने दिली.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Traffic jam for passengers on sion panvel highway and vashi toll plaza amy
First published on: 24-09-2022 at 20:04 IST