वाशी, कोपरखरणेत वाहतूक कोंडी ; बाजारांत गर्दी; पोलिसांचे नियोजन नसल्याने वाहनचालकांची गैरसोय

वाशी सेक्टर ९/१५ आणि कोपरखैरणे सेक्टर १५/७ च्या नाक्यावर सर्वाधिक वाहतूक कोंडी होत आहे.

नवी मुंबई : गेल्या दीड वर्षांनंतर शहरात दिवाळी खरेदीसाठी नागरिक मोठय़ा संख्येने घराबाहेर पडत असून मुख्य बाजार असलेल्या ठिकाणी सायंकाळच्या वेळी प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. पोलिसांचे कोणतेही नियोजन नसल्याने वाशी व कोपरखरणे परिसरात ही समस्या सध्या गंभीर झाली आहे. काही मिनिटांचे अंतर पूर्ण करण्यासाठी आर्धा ते पाऊण तास जात आहे.

वाशी सेक्टर ९/१५ आणि कोपरखैरणे सेक्टर १५/७ च्या नाक्यावर सर्वाधिक वाहतूक कोंडी होत आहे. त्यात बेशिस्त वाहनचालकांची भर पडत आहे. वाहने कुठेही उभी केली जात असल्याने ही समस्या गंभीर झाली आहे. 

वाशीत जैन मंदिर चौक ते वाशी विभाग कार्यालय हे अर्धा किलोमीटरपेक्षा कमी अंतर कापण्यासाठी गर्दीच्या वेळी अर्धा तासापेक्षा अधिकचा वेळ लागत आहे. एकेरी पार्किंग असताना दुहेरी पार्किंग होत आहे. अनेकदा वाहनचालक अध्र्या रस्त्यावरच वाहने उभी करीत खरेदीसाठी बाजारात जात आहेत. ते तासनतास येत नसल्याने या वाहनांचा मोठा अडथळा वाहतुकीस होत आहे. अनेकदा वाहनात चालक बसलेले असतात मात्र ते आपल्यामुळे वाहतूक कोंडी होत असल्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. वाहतूक पोलीसही या वाहनांवर कारवाई करीत नाहीत. वाशीसह कोपरखैरणे सेक्टर ७ ते १५ हे दुसरे ठिकाण वाहतूक कोंडीचे आहे. रा.फ. नाईक चौक ते तीन टाकी चौक हे ५ ते ७ मिनिटांचे पायी अंतर कापण्यास वाहनचालकांना प्रसंगी ३० ते ४५ मिनिटे लागत आहेत.

वाहतूक पोलीस गायब

सध्या वाहतूक पोलीस सिग्नल सोडून काही अंतरावर पुढे कारवाई करताना दिसत आहेत. मात्र बाजाराच्या ठिकाणी एकही वाहतूक पोलीस दिसत नाही. मुळात वाहतूक पोलिसांनी वाहन पार्किंगसाठी नियोजन करीत बाजाराच्या ठिकाणच्या पार्किंगवर निर्बंध घालणे गरजेचे आहे. मात्र कोणतेही नियोजन दिसत नाही.

बेशिस्त वाहनचालकांवर कठोर कारवाई केली जात आहे. आगामी काही दिवस ही कारवाई अधिक क्षमतेने केली जाणार आहे. दोन्ही ठिकाणी भेट देत योग्य त्या सूचनाही दिल्या आहेत. वाहन थांबवून त्यात बसणाऱ्या वाहनचालकांवरही दंडात्मक कारवाई केली जात आहे.

-पुरुषोत्तम कराड, उपायुक्त, वाहतूक शाखा

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नवी मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Traffic jam in vashi kopar khairane due to diwali shopping zws

Next Story
‘एपीएमसी’च्या कचऱ्यापासून गॅस निर्मिती?
ताज्या बातम्या