नवी मुंबई : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पोलीस आयुक्तालयांतर्गत अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात पोलीस निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक आणि उपनिरीक्षक अशा तब्बल ५७ जणांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात काही अधिकारी असेही आहेत की ज्यांचा कार्यकाळ पूर्ण झालेला नाही.

हे वर्ष निवडणुकांचे वर्ष असणार आहे. लोकसभा, विधानसभा आणि पाठोपाठ महानगरपालिकांच्या निवडणुका होण्याची चिन्हे आहेत. त्या अनुषंगाने पोलीसही तयारी करीत असून पूर्ण वर्ष निवडणूक धामधुमीत जाणार आहे. हे पाहता संवेदनशील ठिकाणी सक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याकडे कल दिसून येत आहे.

Left to right) Vijay Dev, Anurag Agarwal and Vikram Dev Dutt. (Express Archives)
चंदीगडच्या IAS अधिकाऱ्यांनी पॅरीसमध्ये केली जिवाची मुंबई, ऑडिट रिपोर्टमध्ये ठपका
Trinamool Congress MPs protesting in front of the Central Election Commission headquarters protested at the police station
तृणमूलचे ‘राजकीय नाटय़’; केंद्रीय तपास यंत्रणांविरोधात पोलीस ठाण्यात २४ तास ठिय्या आंदोलन
Mumbai new road
मुंबई : रस्त्यांच्या कॉंक्रिटीकरणाच्या नवीन कामांसाठी १५ कंत्राटदारांचा प्रतिसाद
baba kalyani s niece nephew move court over property dispute
भारत फोर्जचे अध्यक्ष बाबा कल्याणी यांच्या कुटुंबीयांत संपत्तीचा वाद; कल्याणी यांच्या भाच्यांकडून दिवाणी न्यायालयात दावा

हेही वाचा >>>पेणधरमधील सिडकोच्या लाभार्थींना सदनिकांचा ताबा मिळेना

एकूण ५७ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यात २० पोलीस निरीक्षक, १७ सहाय्यक निरीक्षक, आणि २० उपनिरीक्षकपदांचा समावेश आहे. यातील काही जणांच्या बदल्या कार्यकाळ पूर्ण झाल्याने केल्या असून संवेदनशील ठिकाणी सक्षम अधिकारी म्हणून बदली तर काही अधिकाऱ्यांची खराब कामगिरीमुळे बदली करण्यात आली आहे. अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

बदली करण्यात आलेल्या वैशाली गलांडे, पराग सोनावणे, अजय भोसले, संजीव धुमाळ, शशिकांत चांदेकर, मधुकर भाटे, प्रमोद तोरडमल, अशोक गायकवाड , संजय चव्हाण , राजेंद्र कदम, औदुंबर पाटील, राजेंद्र कोते , दिलीप गुजर, रमेश जाधव, विजय पन्हाळे, विजय भोसले सतीश कदम , अतुल आहेर महेश मुलाणी , भागुजी औटी, या पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे.