Transport office extends till January 15 to calibrate rickshaws in Navi Mumbai city | Loksatta

नवी मुंबई शहरात अद्याप निम्याहून अधिक रिक्षांचे कॅलीब्रेशन नाहीच; परिवहन कार्यालयाकडून १५ जानेवारीपर्यंत मुदतवाढ

नवी मुंबईत रिक्षांच्या मीटरचे रिडींग बदलण्याचे काम १ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आले आहे. मात्र, अद्याप बहुतांश रिक्षाचालकांकडून मीटर कॅलिब्रेशन करून घेण्यात आलेले नाही.

नवी मुंबई शहरात अद्याप निम्याहून अधिक रिक्षांचे कॅलीब्रेशन नाहीच; परिवहन कार्यालयाकडून १५ जानेवारीपर्यंत मुदतवाढ
नवी मुंबई शहरात अद्याप निम्याहून अधिक रिक्षांचे कॅलीब्रेशन नाहीच

एमएमआरडीए क्षेत्रातील सर्व शहरात एक ऑक्टोबरपासून टॅक्सी आणि रिक्षा प्रवासासाठी परिवहन कार्यालयाकडून नवीन दर लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार पहिल्या टप्याच्या प्रवासासाठी २१ ऐवजी आत्ता २३ रुपये मोजावे लागत असून ऑक्टोबरपासून रिक्षांचे मीटर कॅलिब्रेशन करण्याची सुरुवात करण्यात आली आहे. नवी मुंबई शहरात मात्र निम्म्याहून अधिक रिक्षांचे कॅलिब्रेशन करण्यात आलेले नाही. आत्तापर्यंत ३७ हजारांपैकी केवळ १२ हजार मीटर कॅलिब्रेशन झालेले आहे.

हेही वाचा- नवी मुंबईत शहर रंगरंगोटीसाठी करोडोंचा खर्च; पण महापौर बंगल्यासमोरील उद्यान नामफलक बघतोय रंगरंगोटीची वाट

नवी मुंबईत ३७ हजारांहून अधिक रिक्षा आहेत. इथे मीटर आणि सीटप्रमाणे रिक्षा चालवल्या जातात. ज्याप्रमाणे सीट वर प्रवाशी वाहतूक केली जाते, त्याचप्रमाणे मीटरने रिक्षा प्रवास करणाऱ्यांची संख्या ही मोठी आहे. त्यामुळे आता मीटरने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता २१ ऐवजी २३ रुपये द्यावे लागत आहेत. यासाठी मीटरचे रिडींग बदलण्याचे काम ही १ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आले आहे. मात्र अद्याप बहुतांश रिक्षाचालकांकडून मीटर कॅलिब्रेशन करून घेण्यात आलेले नाही. हे मीटर कॅलिब्रेशन कोणत्याही विभागात मुक्त धोरणाअंतर्गत केले जाऊ शकते, त्यामुळे मुंबई सह कल्याण, डोंबिवली इतर उपनगरातही रिक्षा चालकांनी कॅलिब्रेशन केले असल्याची शक्यता आहे ,असे मत आरटीओकडून व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा- ग्रामपंचायत निवडणुकीचा अर्ज आता ऑफलाइन भरता येणार; शेवटच्या दिवशी ५.३० वाजेपर्यंत मुदतवाढ

आणखीन दरवाढ होण्याच्या अपेक्षेने कॅलिब्रेशनला अल्प प्रतिसाद

नवी मुंबई शहरात एकूण ३७ हजार रिक्षा आहेत. त्यापैकी १२हजार पर्यंत रिक्षांचे कॅलिब्रेशन झाली असल्याची माहिती आरटीओ विभागाने दिली आहे. तसेच पेट्रोल ,डिझेल बरोबरच सीएनजीचे ही दर वाढत आहेत. त्यामुळे रिक्षांची भाडेवाढ पुन्हा होईल अशी अपेक्षा रिक्षाचालकांना होती. २3रुपये ऐवजी २५ रुपये होतील , या अपेक्षेने रिक्षाचालकांनी पुन्हा दरवाढ झाल्यानंतरच कॅलिब्रेशन करून घेता येईल. या अनुषंगाने अद्याप मीटर कॅलिब्रेशन केले नसल्याचा अंदाज आरटीओ विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे. बहुतांश रिक्षाचालकांनी मीटर कॅलिब्रेशन केले नसल्याने आता आणखीन ४५ दिवसांची मुदतवाढ दिली असून १५ जानेवारी पर्यंत हे मीटर कॅलिब्रेशन करता येणार आहे.

हेही वाचा- नवी मुंबई: १० वीच्या सराव परीक्षेत ७० शाळा, दहा हजार विद्यार्थी सहभाग

नवी मुंबई शहरात १२हजार पर्यंत रिक्षा मीटर कॅलिब्रेशन झाल्याची नोंद आहे. परंतु परिवहन कार्यालयाकडून मुक्त धोरण अवलंबल्याने इतर उपनगरातही रिक्षाचालक मीटर कॅलिब्रेशन करू शकतात . त्यामुळे त्या ठिकाणीही नवी मुंबईतील रिक्षा चालकांचे मीटर कॅलिब्रेशन झाली असण्याची शक्यता आहे. वाढत्या सीएनजीच्या दराने आणखीन भाडेवाढ होईल या अपेक्षेने काही रिक्षाचालकांनी मीटर कॅलिब्रेशन केले नसल्याचा अंदाज आहे.
हेमांगी पाटील, उपप्रादेशिक अधिकारी , आरटीओ

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-12-2022 at 16:37 IST
Next Story
नवी मुंबईत शहर रंगरंगोटीसाठी करोडोंचा खर्च; पण महापौर बंगल्यासमोरील उद्यान नामफलक बघतोय रंगरंगोटीची वाट