नवी मुंबई : नवी मुंबईत पावसाळापूर्व कामांचा महानगर पालिकेने धडाका लावला खरा, मात्र वृक्ष छाटणी, धोकादायक वृक्ष पाहणीबाबतचा दावा फोल ठरला आहे. गेल्या काही वर्षांत मुंबईत वृक्ष उन्मळून पडून वेगवेगळ्या घटनांत दोनजणांचे मृत्यू झाले होते. त्यामुळे पावसाळापूर्व कामात केवळ वृक्ष छाटणीच नव्हे, तर धोकादायक वृक्षांची पाहणी करून योग्य त्या उपाययोजना एक अत्यंत महत्त्वाचा भाग बनले. मात्र घटना घडून अनेक वर्षे उलटली की व्यवस्था कशी ढिली पडते, याचे ज्वलंत उदाहरण समोर आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आज सव्वापाचच्या सुमारास कोपरखैरणे सेक्टर ५ येथील एक गुलमोहराचे वृक्ष अचानक उन्मळून पडले. डेरेदार असणाऱ्या या वृक्षाखाली दोन रिक्षा व एक मारुती इको गाडी सापडली. त्यात तिन्ही गाड्यांचे प्रचंड नुकसान झाले असून, गाडीचा टप दबल्याने आकार बिघडला आहे, तर रिक्षाच्या समोरील काचा यामुळे निखळल्या गेल्या. सुदैव एवढेच की यावेळी कोणी व्यक्ती झाडाखाली नव्हते. ही घटना कळताच कोपरखैरणे अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत वृक्ष बाजूला केले. वृक्ष पडल्याने प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याने पोलीस आणि वाहतूक पोलीस घटनास्थळी पोहोचले होते. या घटनेत तीन गाड्यांचे नुकसान झाले, अशी माहिती कोपरखैरणे अग्निशमन दलाने दिली.

हेही वाचा – उरण – पनवेल खाडीपूल दुरुस्ती धिम्यागतीने; दिरंगाईमुळे ग्रामस्थांना दिलासा नाही

या घटनेने धोकादायक वृक्षांची पाहणी केल्याचा दावा फोल ठरला आहे. याबाबत कोपरखैरणे विभाग अधिकारी यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tree fall in navi mumbai three vehicles damaged ssb
First published on: 04-06-2023 at 21:19 IST