उरण येथील दिघोडे गावातील आदिवासींची जमीन बिगर आदिवासींच्या नावे झाली आहे. हा फेरफार फसवणूक करून केला असल्याचा आक्षेप घेत मूळ शेतकऱ्याची नात असलेल्या जेष्ठ आदिवासी महिलेने गुरुवारी प्रजासत्ताक दिनी पनवेल येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- स्वच्छ सर्वेक्षणात नवी मुंबईतील इतर शासकीय संस्थांचा निरुत्साह

उरणमधील दिघोडे येथील गोपाळ लहान्या कातकरी यांच्या नावे असलेली जमीन बिगर आदिवासी असलेल्या घरत कुटुंबाच्या नावे करण्यात आली आहे. हा फेरफार पनवेल येथील प्रांताधिकारी कार्यालयातून करण्यात आले आहे. यासाठी आडनावात बदल करून कातकरीचा कासकरी केला असल्याचा आक्षेप मूळ मालकाची नात मुक्ता अनंत कातकरी यांनी घेतला आहे.त्याचप्रमाणे २० जानेवारी २०२३ ला या संदर्भात करण्यात आलेले अपील फेटाळण्यात आले आहे. त्यामुळे या जमिनीचे हस्तांतरण व विक्रीची चौकशी रायगड जिल्हाधिकारी यांनी करावे यासाठी हे उपोषण सुरू करण्यात आले आहे. या उपोषणाला ९५ गाव संघर्ष समितीचे अध्यक्ष ऍड. सुरेश ठाकूर,उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील, संतोष पवार,राजेंद्र मढवी आदींनी जाहीर पाठिंबा दिला आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tribal women on hunger strike at panvel district magistrate offices on republic day against changes dpj
First published on: 26-01-2023 at 15:07 IST