scorecardresearch

नवी मुंबईतील महामार्गावर लघुशंकेसाठी वाहन थांबवणार असाल तर सावधान…

खैर यांच्या पिशवीत कॅमेरा, दोन लेन्स, कॅमेरा चार्जिंग बॅटरी, कॅमेराचा फ्लॅश, रोख रक्कम असा सूमारे ६५ हजार रुपयांचा माल भामट्याने लुटला.

नवी मुंबईतील महामार्गावर लघुशंकेसाठी वाहन थांबवणार असाल तर सावधान…
संग्रहित छायाचित्र / लोकसत्ता

पनवेल : नवी मुंबईतील महामार्गावर लघुशंकेसाठी थांबणार असाल तर ही बातमी नक्की वाचा. ६५ हजार रुपयांचे साहीत्य लुटल्याचा धक्कादायक प्रकार तुमच्यासोबतही घडू शकतो. असाच एक प्रकार नवी मुंबईतील महामार्गावर घडला आहे. दोन दिवसांपूर्वी रात्रीच्यावेळेस उलवा येथे राहणारे ४१ वर्षीय छायाचित्रकार निलेश खैर हे ठाणे बेलापूर महामार्गावरुन घरी जात होते. रात्रीचे साडेदहा वाजले होते. रिलायबल कंपनीजवळील सिग्नल ते चिंचपाडा या दरम्यानच्या बसथांब्यानजीक खैर हे लघुशंकेसाठी थांबले होते.

या दरम्यान तेथे स्कुटीवरून त्या ठिकाणी २० ते ३० वयाचे दोन तरुण पोहचले. या अनोळखी तरुणांनी ते नवी मुंबई महापालिकेचे कर्मचारी असल्याची स्वताची ओळख दिली. खैर यांनी महामार्गालगत उघड्यावर लघुशंका केल्याने त्यांना दंड भरावा लागणार असल्याचे या तरुणांनी सांगीतले. तसेच खैर यांच्याकडील कॅमेरा व महत्वाच्या कागदपत्रांची पिशवी घेऊन खैर यांना नवी मुंबई पालिकेच्या कार्यालयात येऊन दंड भरुन जप्त साहीत्य घेऊन जाण्याचे सांगितले .

हेही वाचा: स्वच्छता संदेशाची नवी मुंबई हाफ मॅरेथॉन यशस्वी; हजारो नागरिकांनी घेतली स्वच्छतेसाठी धावहेही वाचा:

खैर हे त्यानंतर दंड भरण्यासाठी नवी मुंबई महापालिकेच्या कार्यालयात गेले. मात्र तेथे हे दोघेही भामटे सापडले नाहीत. अखेर खैर यांनी या घटनेबाबत पालिकेच्या कार्यालयात माहिती घेतल्यावर त्यांना असे भरारी पथक रात्री गस्तीसाठी नेमले नसल्याचे समजले. अखेर खैर यांनी या घटनेबाबत रबाळे एम. आय.डी.सी. पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलीसांनी या घटनेबद्दल पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला. खैर यांच्या पिशवीत कॅमेरा, दोन लेन्स, कॅमेरा चार्जिंग बॅटरी, कॅमेराचा फ्लॅश, रोख रक्कम असा सूमारे ६५ हजार रुपयांचा माल भामट्याने लुटला. पोलीसांचे पथक या दोनही भामट्यांचा शोध घेत आहेत.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-12-2022 at 11:27 IST

संबंधित बातम्या