नवी मुंबईतील घणसोली शेतकरी संस्था शाळेतील १६ विद्यार्थी करोनाबाधित आढळल्यानंतर त्या शाळेतील आणखी दोन विद्यार्थी करोनाबाधित आढळले असून शाळेतील करोनाबाधित झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या १८ झाली आहे. तर अद्याप अनेक विद्यार्थ्यांचे आरटीपीसीआर चाचणी अहवाल येणे बाकी आहेत. त्यामुळे या शाळेतील करोनाबाधित विद्यार्थ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान आज भीतीपोटी अनेक विद्यार्थी शाळेतच आले नाहीत. परिणामी घरी जाऊन विद्यार्थ्यांची चाचणी करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. तर दुसरीकडे विभागीय शिक्षण उपसंचालक मुंबई यांनी २६ डिसेंबरपर्यंत ही शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक आर.बी. जाधव यांनी लोकसत्ताला दिली आहे.

नवी मुंबईत घणसोली शेतकरी संस्थेच्या शाळेतील १६ विद्यार्थी करोनाबाधित

सर्व करोना बाधित विद्यार्थ्यांना सिडको प्रदर्शनी सेंटर येथे उपचारासाठी ठेवण्यात आले असून सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मुख्याध्यापक जाधव यांनी दिली आहे.