scorecardresearch

नवी मुंबईतून पीएफआय च्या दोन जणांना घेतले ताब्यात

दारावे येथील कार्यालयावर धाड टाकून नवी मुंबई पीएफआयचा अध्यक्ष आसिफ शेख याची सुमारे ९ तास चौकशी करून सोडून देण्यात आले होते.

नवी मुंबईतून पीएफआय च्या दोन जणांना घेतले ताब्यात
नवी मुंबईतून पी एफ आय च्या दोन जणांना घेतले ताब्यात

नवी मुंबई : एक आठवड्यापासून पीएफआय या संघटनेच्या देशातील कार्यालयावर धाडी टाकून कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली हे सत्र अद्याप सुरू आहे. नवी मुंबईतूनही मंगळवारी दोन जणांना ताब्यात घेतले आहे. २२ सप्टेंबरला देश भरात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेच्या कार्यालयावर राष्ट्रीय तपास यंत्रणांनी धाडी टाकल्या होत्या. त्यावेळी नवी मुंबईतील दारावे गावातील पी एफ ओच्या कार्यालयात धाड टाकली होती त्यावेळी दोन जणांना ताब्यात घेतले होते.

देशविधातक कृत्यांना मदत करण्याच्या आरोप त्याच्यावर आहेत. दारावे येथील कार्यालयावर धाड टाकून नवी मुंबई पी एफ आयचा अध्यक्ष आसिफ शेख याची सुमारे ९ तास चौकशी करून सोडून देण्यात आले होते. तसेच पनवेल येथील कार्यलयावर ही धाड टाकण्यात आली होती. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात पनवेल येथून एक तर दारावे येथुन दोन जणांना ताब्यात घेण्यात आले होते.

हेही वाचा : आंदोलनानंतर सिडको मंडळाला जाग; नवीन पनवेल उड्डाणपुलावरील खड्डे होणार दुरुस्त

याच कारवाई वेळी मोठ्या प्रमाणात कागदपत्रे, भित्ति पत्रक व हातात धरण्याचे फलक जप्त करण्यात आले होत्या. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणा प्रमाणे मजकूर होता. मंगळवारी नेरुळ येथून एक तर खारघर येथून एक असे एकूण दोघांना ताब्यात घेण्यात आले. याला पोलिसांनी पुष्टी दिली असली तरी पूर्ण माहिती देण्यास असमर्थता दर्शीवली. दोन्ही आरोपींना वाशी न्यायालयात हजर केले जाणार आहे.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या