२०२२ मध्ये चारफाट्यावरील उत्खननात  दोन टनाची ऐतिहासिक तोफ सापडली होती. ही तोफ दोनशे शिवप्रेमींच्या प्रयत्नानंतर रविवारी अखेर किल्ल्यावर पोहचवीली. तोफ पोहचताच शेकडो शिव,गड-दुर्ग प्रेमींनी भंडारा उधळत जल्लोष करत व हर हर महादेव, जय शिवाजी जय शिवरायांच्या जयघोष केला.

हेही वाचा >>> ‘शिंदेंच्या मनात उठावाचं बीज मीच पेरलं,’ शिवतारेंच्या विधानाचा राऊतांनी घेतला समाचार, म्हणाले, “अरे तुझं नशीब…”

Statue, Shivaji Maharaj, Assam,
आसाममध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा, चीनच्या सीमेवर २१ पॅरा स्पेशल फोर्समध्ये अनावरण, साताऱ्यातील सुपुत्राचा पुढाकार
truck hit young mens carrying a flame on the occasion of Sacrifice Day
बलिदान दिनानिमित्त ज्योत घेऊन निघालेल्या तरुणांना ट्रकची धडक; एकाचा मृत्यू, तिघे जखमी
nagpur and bhandara,dhirendra shastri, bageshwar dham, controversial statement, jumdev maharaj, followers, Sparks Outrage, fir register, arrest demand, maharashtra, marathi news,
बागेश्वर बाबा वादग्रस्त विधानाने पुन्हा चर्चेत, जुमदेव महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य; भंडारा, नागपूरमध्ये तणाव
dharashiv, tulja bhavani
तुळजाभवानी देवीचे दागिने चोरणारे फरारच! प्रमुख तीन संशयितांची नार्को टेस्ट करा : गंगणे

तोफ किल्ल्यावर नेण्यासाठी शिवप्रेमी,दुर्ग प्रेमी संघटना प्रयत्नशील होत्या. ११ डिसेंबरला १२५ शिवप्रेमींनी पहिला प्रयत्न करीत पहाटे चार वाजल्यापासूनच चेनकप्पी,रस्सी आणि हायजोशच्या जोरावर ऐतिहासिक तोफ गडावर नेण्यासाठी सुरुवात केली होती.दोन टन वजनाची आणि साडेसात फूट लांबीची तोफ ९०० ते १००० मीटर उंचीच्या द्रोणागिरी डोंगरावरील द्रोणागिरी किल्ल्यावर पोहचविण्यासाठी पायथ्यापर्यंत जेसीबीने त्यानंतर चेनकप्पी,रस्सीचा वापर केला होता.मात्र  १२५ शिवप्रेमींची ताकत अपुरी पडली होती.त्यामुळे अपुऱ्या मनुष्यबळामुळे तोफ किल्ल्यावर पोहचविण्याची मोहीम अपूर्ण राहिली होती.त्यानंतर  जिद्द बाळगून असलेल्या सुमारे दोनशे शिव,गड-दुर्ग प्रेमींनी रविवारी (२५ ) नाताळाचा मुहूर्त साधून पुन्हा दुसऱ्यांदा प्रयत्न सुरु केला.यासाठी पहाटे सहा वाजता तोफ द्रोणगिरी किल्ल्यावर पोहचविण्यासाठी सुरुवात शिवरायांचा घोष करीत दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास फत्ते केली.