बुधवारी उरण पनवेल मार्गावर झालेल्या अपघातात दोन तरुणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या दोन वेगवेळ्या अपघाताला कंटेनर वाहने जबाबदार आहेत. आशा प्रकारच्या कंटेनरच्या धडकेत या वर्षात मागील ९ महिन्यात २५ जणांना आपले जीव गमवावे लागले आहेत. त्यामुळे या यमदूत रुपी कंटेनरना आणखी किती बळी हवेत असा सवाल येथील वाहन चालक व जनतेकडून केला जात आहे. कारण यातील बहुतांशी अपघात हे रस्त्यावर उभ्या करण्यात येणाऱ्या बेकायदा कंटेनर वाहनांमुळे झाले आहेत. किंवा भरधाव कंटेनर वाहनाने धडक दिल्याने झाली आहेत. हेही वाचा- नागरिकांच्या सतर्कतेमुळे भामट्याला अटक; जेष्ठ नागरिकाची ५० हजार रुपयांची सोनसाखळी सापडली जेएनपीटी बंदरातील मालाची ने आण करणारी दहा हजारांहून अधिक कंटेनर वाहने दररोज उरण मधील दोन्ही राष्ट्रीय महामार्गावरून ये जा करीत आहेत. या कंटेनर वाहनांच्या बेदरकारीमुळे ३३ वर्षात शेकडो दुचाकीस्वाराना आपले प्राण गमवावे लागले आहेत. सुरुवातीला अरुंद व खड्डेमय रस्त्यामुळे तर सध्या रस्ता रुंदीकरणा नंतर जेएनपीटी बंदर ते नवी मुंबई व पळस्पे या दोन्ही मार्गावर बेकायदा उभी करण्यात आलेल्या कंटेनर वाहनांचा अंदाज न आल्याने झालेल्या अपघात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. हेही वाचा- लवकरच नवी मुंबईकरांना मिळणार डबल डेकरची सफर ! एनएमटीच्या ताफ्यात १० विद्युत डबल डेकर बस दाखल जेएनपीटी बंदराला जोडणाऱ्या जेएनपीटी ते किल्ला (नवी मुंबई) व जेएनपीटी ते पळस्पे या दोन्ही राष्ट्रीय मार्गावर उरण सामाजिक संस्थेने केलेल्या आंदोलनामुळे प्रवासी वाहतूक व गावांना जोडणाऱ्या सेवा(सर्व्हिस) मार्गाची उरणारणी करण्यात आली आहे.मात्र ही सेवा मार्गच कंटेनर वाहनामुळे वाहनतळ झाली आहेत. त्यामुळे प्रवासी व दुचाकी वाहने मुख्य मार्गाचा वापर करीत आहेत. याचा फटका या वाहनांना बसून अपघातात वाढ झाली आहे. हेही वाचा- उरणचे प्रवेशद्वार असलेला चारफाटा पुन्हा अंधारात; नागरिकांची गैरसोय बुधवारी उरण पनवेल मधील जासई गावाजवळ झालेल्या अपघातात अवघ्या २० वर्षाच्या तरुणांचा तर गव्हाण फाटा येथील मार्गावर एका तरुणीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या कंटनेर रुपी यमदूताना आणखी किती बळी हवेत असा प्रश्न केला जात आहे.