लोकसत्ता प्रतिनिधी
उरण: या मार्गावरील स्थानकांना स्थानिक गावांची नावे व प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन या मागण्यासाठी सोमवार पासून बोकडविरा ग्रामस्थ आंदोलन करणार आहेत. खारकोपर ते रेल्वे या बहुप्रतिक्षित लोकल मार्गाचे उरणच्या भूमिपुत्रांनी स्वागत केले आहे. मात्र या दळणवळणाच्या विकास गंगेचा लाभ आम्हाला होणार का? असा सवाल या रेल्वे मार्गासाठी जमिनी देणाऱ्या भूमिपुत्रांनी रेल्वे आणि सिडको प्रशासनाला केला आहे.
खारकोपर ते उरण रेल्वे मार्गावरील बोकडविरा(द्रोणागिरी) स्थानकाच्या नाव आणि रेल्वे साठी जमिनी संपादीत होऊनही पुनर्वसन न झाल्याने निर्माण झालेला अस्मिता व अस्तित्वाचा प्रश्न समोर आला आहे. त्यामुळे सोमवार पासून बोकडविरा ग्रामस्थ,ग्रामपंचायत यांच्या नेतृत्वाखाली आपल्या मागण्यासाठी आंदोलन करणार आहेत. या संदर्भात दोन्ही गावांना सिडको आणि रेल्वेने आश्वासन देऊन ही ते पाळलं नसल्याचं ग्रामस्थांच म्हणणं आहे.
आणखी वाचा- नवी मुंबई: विधानसभेवर नाशिक ते मुंबई लॉंग मार्च, रायगडमधील शेतकरीही सहभाग होणार
रेल्वेच्या उच्च अधिकाऱ्याची पाहणी
शनिवारी या रेल्वे मार्गाची मध्य रेल्वेचे उपविभागीय आयुक्त रजनीश कुमार गोयल आणि सुरक्षा आयुक्त यांनी केली पाहणी खारकोपर ते उरण दरम्यानच्या रेल्वे मार्गाची पाहणी. या पाहणीच्या वेळी कोट येथील रेल्वे प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांनी रेल्वे व्यवस्थापकाना आपल्या मागण्याचे निवेदन दिले. यावेळी नरेश रहाळकर,नवनीत भोईर व निलेश भोईर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
सिडकोचे चर्चेचे निमंत्रण
बोकडविरा गावचे स्थानकाला नाव व प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन या मागणीसाठी सोमवार आंदोलन होणार आहे. याची दखल घेत सिडकोच्या सहव्यवस्थापिय संचालक कैलास शिंदे यांनी ग्रामस्था सोबत चर्चेची तयारी दर्शविली असल्याची माहीती जेएनपीटीचे माजी कामगार विश्वस्त भूषण पाटील यांनी दिली आहे. तर सोमवारी बोकडविरा ग्रामस्थ स्थानकात जमून आंदोलन करणार असल्याची माहीती बोकडविरा ग्रामपंचायत सरपंच अपर्णा पाटील यांनी दिली आहे.