Girl Murder in Navi Mumbai: नवी मुंबईतल्या उरण मध्ये २२ वर्षीय तरुणी यशश्री शिंदेची अत्यंत निर्घृणपणे हत्या ( Girl Murder ) करण्यात आली. त्यानंतर तिच्या मृतदेहाची विटंबना करण्यात आली. या प्रकरणात आरोपी दाऊद शेखला पोलिसांनी अटक केली आहे. या दाऊदला फाशी दिली जावी अशी मागणी यशश्रीच्या कुटुंबाने केली आहे.

नेमकी घटना काय घडली?

२२ वर्षीय यशश्री शिंदे नावाची तरुणी २५ जुलैपासून बेपत्ता झाली होती. उरण शहरातील एनआय स्कूलजवळ राहणाऱ्या यशश्रीचा ( Girl Murder ) मृतदेह रविवारी कोटनाका पेट्रोल पंपाजवळ आढळून आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला तेव्हा तिच्या शरीराची विटंबना केल्याचे लक्षात आले. चेहरा, शरीर आणि गुप्तांगावर जखमा आढळून आल्या. दाऊद शेखने तिची हत्या केली आणि त्यानंतर तिच्या मृतदेहाची विटंबना केली. ही बातमी उरण शहरात पसरल्यानंतर आता नवी मुंबई आणि उरणमधील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष पसरला.या प्रकरणात पोलिसांनी आरोपी दाऊद शेखला अटक केली आहे.

Manipur Curfew
Curfew  in Manipur : आता घराबाहेर पडण्यासही मनाई; मणिपूरमध्ये नेमकी परिस्थिती काय?
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
Bhagyashree Atram daughter of Minister Dharma Rao Baba Atram to join Sharad Pawar faction
गडचिरोली : धर्मरावबाबा आत्राम कुटुंबातील बंडावर शिक्कामोर्तब; भाग्यश्री आत्राम १२ सप्टेंबरला…
Minor girl murder Jalgaon, girl murder torture,
जळगावमध्ये अल्पवयीन मुलीची अत्याचारानंतर हत्या
traffic jam at Ghodbunder road , thane
कोंडीच्या चक्रव्यूहात घोडबंदरकर, सलग दुसऱ्या दिवशी वाहतुक कोंडी, वाहन चालकांकडून संताप व्यक्त, महिला प्रवासी रडकुंडीला
Vasind police station, three employees Suspension,
वासिंद पोलीस ठाण्यातील तीन कर्मचाऱ्याचे निलंबन, तरुणाच्या मृत्यूनंतर ठाणे ग्रामीण पोलिसांची कारवाई
pune married women suicide with her daughter
पुणे : पतीच्या त्रासामुळे महिलेची मुलीसह विहिरीत उडी मारून आत्महत्या,पतीला दहा वर्षे सक्तमजूरी
Jodhpur Gangrape Hospital
Jodhpur News: जोधपूरच्या वैद्यकीय महाविद्यालय परिसरात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार; दोन जण ताब्यात

हे पण वाचा- Navi Mumbai Girl Murder : उरणमध्ये तरूणीची निर्घृण हत्या करत मृतदेहाची विटंबना, एकतर्फी प्रेमातून हत्या करणाऱ्या आरोपीला कर्नाटक सीमेवरून अटक

कोण होती यशश्री शिंदे?

यशश्री शिंदे ही तिच्या कुटुंबीयांसह उरणमध्ये वास्तव्य करत होती

यशश्रीने कॉमर्सची पदवी घेतली होती, त्यानंतर लगेचच ती एका कंपनीत काम करु लागली

बेलापूर या ठिकाणी असलेल्या कॉल सेंटरमध्ये ती डेटा एंट्री ऑपरेटर म्हणून काम करत होती.

दाऊद शेख विरोधात २०१९ मध्येही तक्रार

२५ जुलैपासून यशश्री बेपत्ता झाली. मात्र मिळालेल्या माहितीनुसार २०१९ मध्ये यशश्री अल्पवयीन असतानाही दाऊद शेखच्या विरोधात यशश्रीच्या कुटुंबाने पॉक्सो अंतर्गत तक्रार दाखल केली होती. यशश्री १४ ते १५ वर्षांची होती तेव्हा दाऊद शेखला या प्रकरणात तुरुंगात जावं लागलं होतं. त्याला दीर्घकाळ तुरुंगात रहावं लागलं होतं. या प्रकरणात आरोपी दाऊदला पोलिसांनी अटक केली. आता पुढील चौकशी सुरु आहे. मात्र शिंदे कुटुंबाने यशश्रीला ठार करणाऱ्या दाऊदला फाशी झाली पाहिजे अशी मागणी केली आहे.

यशश्री शिंदेच्या कुटुंबाने काय मागणी केली आहे?

“यशश्रीला दाऊद सातत्याने सतवत होता. ती वडिलांकडे तक्रार करायची, यशश्रीच्या वडिलांनी त्याला ताकीदही दिली होती. मात्र त्याने ऐकलं नाही. तो सातत्याने तिला मेसेज करायचा, तिला त्रास देत होता. त्याने तिला ज्या पद्धतीने मारलं ( Girl Murder ) त्यानंतर आमची एकच मागणी आहे की त्या दाऊदला लवकरात लवकर फाशी द्या.” यशश्रीचा भाऊ म्हणाला, “माझ्या बहिणीला जो त्रास झाला तसंच तिच्याबरोबर जे घडलं त्यानंतर आमची सरकारला ही विनंती आहे की दाऊदला फाशी झाली पाहिजे. इतर कुठल्या घरात असा प्रसंग होऊ नये यासाठी आम्ही हे आवाहन सरकारला करत आहोत” असं यशश्रीच्या भावाने म्हटलं आहे. “आरोपीवर लवकरात लवकर आणि कठोर कारवाई करण्यात यावी ही आमची मागणी आहे” असं यशश्रीच्या वडिलांनी म्हटलं आहे.