उरण : शेतकऱ्यांनी सुक्या पेरण्या केल्या आहेत. मात्र सध्या पावसाने दडी मारली असल्याने पेरण्या वाया जावू नये यासाठी या पेरण्यावर कापडी आच्छादन टाकले आहे. घरातील साड्यांचा वापर शेती सुरक्षित ठेवण्यासाठी करण्यात येत आहे.
यावर्षी मे महिन्यातच पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. मात्र पावसाळ्यापूर्वी करण्यात येणाऱ्या भाताच्या सुक्या पेरण्या वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. तप्त जमीन आणि त्यात पेरणी केलेले धान्य या उष्णतेमुळे आणि त्यानंतर आलेल्या जोरदार पावसामुळे भाताचा अंकुर फुटण्यास मदत होते. यासाठी शेतकरी भाताच्या सुक्या पेरण्या करतात. मात्र यावेळी अगोदरच पावसाला सुरुवात झाली आहे. पेरणी वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
२ हजार ४०० हेक्टरवर भात पीक
रण तालुक्यात जवळपास २ हजार ४०० हेक्टर जमिनीवर भात पीक घेतले जात आहे, मात्र अवकाळी, अती पाऊस, नापिकी शेती आदी संकटे वारंवार येऊनही शेतकरी शेती करीत आहेत. मेमधील पावसानंतर पुन्हा एकदा दडी मारल्याने शेतकरी धास्तावले आहेत. अनियमित पावसाचा सामना करीत येथील शेतकरी कष्टाने व नेटाने शेती करीत आहे.