उरण : उरणमधील चार ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी बुधवारी निवडणूक घेण्यात आली असून यात केवळ फुंडे ग्रामपंचायतीत ७ विरुद्ध दोन अशी निवडणूक झाली. अन्य ठिकाणी बिनविरोध निवड करण्यात आली. सत्तेसाठी विरोधात लढलेल्या पक्षांनी सरपंचपदासाठी समझोता केल्याचे दिसून आले. शिवसेना, भाजप तसेच भाजप व शेकाप यांनी एकत्र येत या ग्रामपंचायतीवर आपली सत्ता राखली आहे.

चाणजे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शिवसेना-भाजपचे मंगेश जयराम थळी, केगावमध्ये काँग्रेस-शेकाप महाविकास आघाडीचे अनिल पाटील, फुंडे ग्रामपंचायत सरपंचपदी महाविकास आघाडीचे सागर श्रीधर घरत, म्हातवली ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रंजना चारुदत्त पाटील यांची निवड झाली आहे. तर वेश्वी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी लावण्यात आलेल्या सभेत कोरम पूर्ण न झाल्याने येथील निवडणूक रद्द करण्यात आलेली आहे. तर नागाव ग्रामपंचायत सरपंच आरक्षणामुळे न्यायप्रविष्ट आहे.