उरण तालुक्यासाठी मंजूर झालेल्या उपजिल्हा रुग्णालयाच्या उभारणीला सुरवात करावी. या मागणीसाठी उरणच्या तहसीलदाराना रविवारी गांधी जयंतीच्या निमीत्ताने गांधीगिरी करीत उरण सामाजिक संस्थेने निवेदन दिले.

हेही वाचा- सायन- पनवेल मार्गावरील लुकलुकणाऱ्या दिव्याची दुरुस्ती

२०११ मध्ये उरण तालुक्यात उपजिल्हा रुगणालय उभारण्याची घोषणा सरकारने केली आहे. त्यानंतर सिडकोच्या माध्यमातून उरण पनवेल मार्गावरील वायू विद्युत केंद्राच्या कामगार वसाहती शेजारी भूखंड ही देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे ५७ कोटी रुपयांचा निधी ही मंजूर झाला आहे. तरीही उरण मध्ये रुग्णालयाच्या उभारणीला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे उरणच्या नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. उरणच्या जनतेच्या भावना व्यक्त करण्यासाठी उरण सामाजिक संस्थेने गांधी जयंती निमित्ताने ही मागणी तहसीलदारांच्यावतीने राज्य सरकारकडे केली आहे.

हेही वाचा- नवी मुंबई : आमदार गणेश नाईक यांच्या गावात बेकायदेशीर बांधकामाचे जाळे; निकृष्ठ दर्जाच्या कामामुळे एक इमारत कोसळली

हा राज्यातील औद्योगिक क्षेत्रातील प्रथम क्रमांकाचा तालूका असतांनाही येथील नागरिकांना उपचारासाठी मुंबई, नवी मुंबई व पनवेल गाठावे लागत आहे. हा उरण मधील रुग्णांना ४० ते ६० किलोमीटरवरचे अंतर पार करीत असतांना वेळीच उपचार न झाल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. उरण सामाजिक संस्था सन २०१० पासून तालुक्यात सुसज्ज रुग्णालय व्हावे या मागणीसाठी दरवर्षी गांधी जयंती निमित्ताने २ ऑक्टोबर रोजी लाक्षणिक उपोषण, धरणे आंदोलन , निदर्शने आदी मार्गांचा अवलंब करत आलेली आहे.

हेही वाचा- नवी मुंबईत वीज वितरण परवान्यासाठी ‘अदानी’चा अर्ज; महाराष्ट्रात वीज क्षेत्रात खासगीकरण पर्वाची चाहूल

२०११च्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विधानसभेत तत्कालीन आमदारांनी तारांकित प्रश्न उपस्थित केल्यामुळे व त्याचा पाठपुरावा केल्याने उरणला शंभर खाटांचे उपरूग्णालय उभारण्यासाठी सिडकोकडून भूखंड मंजूर झाला आला. त्याची किंमतही देण्यात आली आहे. या प्रत्येक बाबतीत उरण सामाजिक संस्थेचा सहभाग महत्वपूर्ण राहिला आहे. त्यामुळे उरणमधील नागरिकांच्या सुविधेसाठी रुग्णालयाची उभारणी लवकरात लवकर करण्याची मागणी होत आहे. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील, कार्याअध्यक्ष कॉ. भूषण पाटील, सीमा घरत , महिला आघाडी व सचिव संतोष पवार यांच्या नेतृत्वाखाली उरणचे नायब तहसिलदार जी. बी. धुमाळ यांची भेट घेऊन निवेदन दिले.