उरण येथील एसटी महामंडळाच्या उरण स्थानकातून ये जा करणारी एप्रिल २०२२ मधील १ लाख २७ हजार ६५६ प्रवासी संख्या वाढून २०२३ मध्ये ३ लाख ९१ हजार ६६७ वर पोहचली आहे. मात्र या स्थानकात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे सध्या मे महिन्यातील कडक उन्हात एस टी प्रवाशांची पाण्या विना तडफड सुरू आहे. त्यामुळे उरणच्या एस टी स्थानकात पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात आली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
उरण मधील औद्योगिक व नागरीकरण झपाट्याने वाढू लागले आहे. त्यामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. उरण मधून सध्या पनवेल,दादर सह नाशिक ,शिर्डी तसेच पश्चिम महाराष्ट्र आदी भागात प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. यामध्ये मुंबईतील दादर सेवेतील प्रवासी संख्या कमी झाली आहे. तर पनवेल मार्गावरील प्रवासी संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. त्यासाठी बसची संख्या अपुरी पडत आहे. मात्र उरण बस स्थानकात असलेला पिण्याच्या पाण्याचा कुलर आणि पाण्याची टाकी ही नादुरुस्त झाली आहे. त्यामुळे एस टी बस ची प्रतिक्षा करीत असताना पाण्या विनाच प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे. स्थानकातील पिण्याच्या पाण्यासाठी मदत करण्याचे एका स्वयंसेवी संस्थेने आश्वासन दिले असून १ जून पासून व्यवस्था केली जाईल अशी माहीती उरणचे आगर प्रमुख सतीश मालपे यांनी दिली आहे.
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
First published on: 28-05-2023 at 20:16 IST