उरण : अनेक दिवसांपासून सुरू होण्याची प्रतिक्षा असलेल्या उरण ते खारकोपर लोकलच्या कामांचा शनिवारी दुपारी मध्य रेल्वेच्या उपव्यवस्थापकांनी आढावा घेतला. यावेळी त्यांनी खारकोपर ते उरण मार्गावरील गव्हाण, रांजणपाडा, न्हावा शेवा, द्रोणागिरी आणि उरण या स्थानकांच्या कामांची पाहणी केली.

हेही वाचा : ‘झोपु’ योजनेवरून महायुतीत संघर्ष, चटई क्षेत्रास विरोधामुळे गणेश नाईक यांच्यावर शिंदे गटातील नेत्यांचे टीकास्त्र

मध्य रेल्वेचे मुंबई विभागाचे उपव्यवस्थापक रजनीश कुमार गोयल यांनी ही पाहणी केली. त्यावेळी सर्व स्थानकातील सुविधा तसेच इतर कामांचाही आढावा घेतला. पंतप्रधानांच्या भेटीचे संकेत मिळाल्याने रेल्वेकडून उरण ते खारकोपर मार्गाच्या कामांना वेग देण्यात आला आहे.

Story img Loader