उरण : विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीत एकमत न झाल्याने शिवसेना ठाकरे गट व शेतकरी कामगार पक्ष या दोन्ही घटक पक्षांचे अर्ज कायम राहिल्याने आता उरण विधानसभा निवडणूक ही तिरंगी होणार असल्याचे निश्चित झाले आहे. शिवसेना व शेकाप या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनी जिंकण्याचा दावा केला आहे. उरण विधानसभा मतदारसंघात आता एकूण १४ उमेदवार शिल्लक राहिले आहेत. मात्र मुख्य लढत ही भाजपा, शिवसेना ठाकरे व शेतकरी कामगार पक्ष या तीन प्रमुख पक्षात होणार आहे. त्यामुळे यावेळी उरण मतदारसंघातील मतदार कोणाच्या पारड्यात यश टाकतात ते पहावे लागेल.

ही विधानसभा निवडणुकही २०१९ प्रमाणेच भाजपा, शिवसेना(ठाकरे) व शेतकरी कामगार पक्ष यांच्यात तिरंगी होत आहे. त्यामुळे या निवडणुकीतही भाजपा, शिवसेना (उद्धव ठाकरे) व शेकाप यांच्यात चुरशीच्या लढतीचे चित्र आहे. उरण मतदारसंघात एकूण ३ लाख ३६ हजार २२० मतदार आहेत. यामध्ये १ लाख ६८ हजार ७११ पुरुष तर १ लाख ६७ हजार ४०७ महिला मतदारांची नोंद झाली आहे. २०१९ च्या निवडणुकीनंतर शिवसेनेत विभाजन झाले. तर शेकापही खिळखिळा झाला होता. मात्र लोकसभा निवडणुकीत शेकाप व शिवसेना (उद्धव ठाकरे), काँग्रेस आणि इतर पक्षांनी एकत्र येत उरण विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला मताधिक्य मिळविले होते. त्यामुळे महाविकास विरोधात महायुती अशी थेट लढत होण्याची अपेक्षा मतदारांना होती. उरणमध्ये महाविकास आघाडीतील रस्सीखेचीमुळे ही निवडणूक तिरंगी होणार आहे. सध्या उरण विधानसभा निवडणुकीसाठी भाजप,शिवसेना (उद्धव ठाकरे) व शेतकरी कामगार पक्ष या तीन प्रमुख पक्षांनी प्रचार सुरू केला आहे. इच्छुक उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करू लागले आहेत. काहींनी तर मतदान केंद्रनिहाय आपली तयारीही पूर्ण केली आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे. उरण विधानसभा निवडणुकीत विद्यमान आ. महेश बालदी हे भाजपकडून, माजी आ. मनोहर भोईर शिवसेना ठाकरे गटाकडून तर प्रीतम म्हात्रे यांनी शेतकरी कामगार पक्षाकडून उमेदवारी मिळवली आहे. यातील महेश बालदी हे भाजपाला पाठिंबा देणारे अपक्ष आमदार आहेत. मात्र या निवडणुकीत त्यांना भाजपाकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. त्याचा प्रचारही सुरू झाला आहे. यावेळी उरणमध्ये कमळ फुलणार असा दावा करण्यात येत आहे. महाविकास आघाडीच्या वतीने ठाकरे गटाकडून माजी आ. मनोहर भोईर यांनी या निवडणुकीत आपण लढणार आणि जिंकणार असा दावा केला आहे. दुसरीकडे शेतकरी कामगार पक्षाने प्रीतम म्हात्रे यांनी महाविकास आघाडीच्या निर्णयाच्या विरोधात जाऊन आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवण्यात आला आहे. त्यांनीही लढाऊ व संघर्षरत शेतकरी कामगार पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या ऐकीवर लढणार आणि जिंकणारच असा दावा उमेदवारी कायम ठेवल्या नंतर केला आहे.

MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Rohit Patil
Rohit Patil : “अमृताहुनी गोड…”; विधानसभेत रोहित पाटलांचं…
belapur rebel in congress
बेलापूरमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादीत बंड; अनिल कौशिक, राजू शिंदे यांचा भाजप प्रवेश
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Eknath shinde shivsena
नवी मुंबईत शिंदे शिवसेनेचे बंड कायम; ऐरोलीत विजय चौगुले, तर बेलापूरमध्ये विजय नहाटा रिंगणात
What Poona Mahajan Said About Uddhav Thackeray ?
Poonam Mahajan : “लोकसभेला तिकिट कापण्यात आलं तेव्हा उद्धव ठाकरेंनी…”, पूनम महाजन काय म्हणाल्या?
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

हेही वाचा :बेलापूरमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादीत बंड; अनिल कौशिक, राजू शिंदे यांचा भाजप प्रवेश

शिट्टीची चर्चा : प्रीतम म्हात्रे यांनी महाविकास आघाडीत बंडखोरी करीत निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना शिट्टी हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. त्यामुळे या चिन्हाची चर्चा सुरू आहे. कारण महायुतीत बंडखोरी करीत विद्यमान आमदार महेश बालदी यांनीही २०१९ मध्ये शिट्टी चिन्ह घेत निवडणूक जिंकली होती.

Story img Loader