नेरुळ, वाशी व ऐरोली रुग्णालयात  १ ते ५ वेळेत सुविधा

नवी मुंबई</strong> :  शहरात १२ ते १४ वयोगटातील विद्यार्थ्यांच्या लसीकरणास बुधवारपासून प्रारंभ होणार असून पहिल्या दिवशी दुपारी १ ते ५ या वेळेत नेरुळ, वाशी, ऐरोली या पालिकेच्या तीन रुग्णालयांत लसीकरण करण्यात येणार आहे. त्यानंतर इतर वयोगटातील लसीकरणाप्रमाणेच सकाळी ९ ते ५ या वेळात लसीकरण होणार असल्याची माहिती पालिकेच्या लसीकरणप्रमुख डॉ. रत्नप्रभा चव्हाण यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.

rte marathi news, rte latest marathi news
आरटीई अंतर्गत बदलांमुळे विद्यार्थ्यांच्या चौथी, सातवीनंतरच्या शिक्षणाचे काय होणार?
Telangana school attacked over saffron clothing row
विद्यार्थ्यांच्या भगव्या कपड्यांवर मुख्याध्यापकांचा आक्षेप; संतप्त जमावाकडून शाळेची तोडफोड, गुन्हा दाखल
Babasaheb Ambedkar Research and Training Institute
बार्टीचे अधिकारी निघाले लंडनला! ग्लोबल भीमजयंतीच्या नावाखाली वंचित विद्यार्थ्यांच्या पैशाचा…
Rosary School Director s Arrest Court Extends Vinay Arhana s Custody in Loan Misappropriation Case
रोझरी स्कूलचा संचालक विनय अऱ्हानाच्या पोलीस कोठडीत चार दिवसांनी वाढ

शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार १५ ते १८ या वयोगटातील मुलांचे लसीकरण ३ जानेवारीपासून सुरू करण्यात आले बुधवारपासून  १२ ते १४ वयोगटातील लसीकरणाचा श्रीगणेशा करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे ६० वर्षांवरील सर्वानाच आता वर्धक मात्रा बुधवारपासून दिली जाणार आहे. ६० वर्षांवरील नागरिकांसाठी वर्धक मात्रा देण्यासाठीची सहव्याधीची अट  रद्द करण्यात आल्याने ६० वर्षांवरील सर्वानाच आजपासून वर्धक मात्रा मिळणार आहे. लसीकरणाच्या या कार्यवाहीत पालक, विद्यार्थी व शाळांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नयेत व आल्याच तर त्याचे निराकरण त्वरित व्हावे या दृष्टीने महानगरपालिकेने तयारी केली आहे.

शासनाच्या कोविन पोर्टलवरही पालक आपल्या लाभार्थी विद्यार्थ्यांच्या नावाची नोंद करू शकतात. तसेच  थेट लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेऊ शकतात. परंतु १२ ते १४ या वयोगटासाठी लस घेण्यासाठी पात्र असलेली मुले ही १५ मार्च २००८ ते १५ मार्च २०१० या दरम्यानच्या काळात जन्म झालेल्या मुलांना लस घेता येणार आहे. तसेच लसीकरण करण्यासाठी पालकांनी आपल्या मुलाचे आधारकार्ड किंवा जन्मतारखेचा उल्लेख असलेले कागदपत्र बरोबर घेऊन येणे आवश्यक आहे. 

शहरातील १२ ते २४ वयोगटातील  विद्यार्थ्यांना केंद्राच्या व राज्याच्या निर्देशानुसार आजपासून कोर्बेव्हॅक्स लशीची मात्रा दिली जाणार आहे. तरी सर्व पालकांनी आपल्या पाल्याचे लसीकरण करून घ्यावे. मास्कचा वापर मात्र नियमित करावा.  – अभिजीत बांगर, आयुक्त, महापालिका

लसीकरण सुविधा

नेरुळ, ऐरोली, वाशी महापालिका रुग्णालयांत

वेळ : दुपारी १ ते ५ वाजेपर्यंत

* १५ मार्च २००८ ते १५ मार्च २०१०  या दरम्यानच्या काळात जन्म झालेल्या मुलांना लस घेता येणार आहे.