scorecardresearch

Premium

नवी मुंबई : वृक्षारोपण करून साजरी केली वटपौर्णिमा, आर्यवर्त फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम

पर्यावरणाचे संवर्धन व्हावे व विधीही व्हाव्या या संकल्पनेतून नेरूळमधील आर्यवर्त फाउंडेशन तर्फे वडाची झाडे लावून वटपौर्णिमा साजरी करण्यात आली.

Vat purnima celebrated Navi Mumbai
नवी मुंबई : वृक्षारोपण करून साजरी केली वटपौर्णिमा, आर्यवर्त फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम (छायाचित्र – लोकसत्ता टीम/ग्राफिक्स)

नवी मुंबई : वटपौर्णिमेला महिला वडाच्या झाडाला फेऱ्या मारून पूजा करतात तर काही महिला वडाची फांदी आणून पूजा करतात. मात्र याने पर्यावरणाची हानी होते. त्यामुळे पर्यावरणाचे संवर्धन व्हावे व विधीही व्हाव्या या संकल्पनेतून नेरूळमधील आर्यवर्त फाउंडेशन तर्फे वडाची झाडे लावून वटपौर्णिमा साजरी करण्यात आली.

वटपौर्णिमा हा सौभाग्यवर्धन आणि आयुष्यवर्धन असणारा सण आहे. त्यामुळे अधिक जीवन असणाऱ्या वडाच्या झाडाला दोरा बांधून आपल्या सौभाग्यासाठी महिला पूजा करतात. वड आणि पिंपळाची झाडे ही नैसर्गिक ऑक्सिजनचा खूप मोठा स्रोत आहेत. म्हणून या वटपौर्णिमा सणानिमित्त आर्यवर्तन फाउंडेशन तर्फे वडाचे, पिंपळाचे आणि नारळाचे झाड लावून त्यांचे पूजन करण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन नेरूळमध्ये केले होते. या कार्यक्रमात पुरुष मंडळींनी वड-पिंपळाची झाडे लावली, तर महिलांनी त्या वृक्षसंवर्धनाची जबाबदारी घेऊन पूजा केली. अशा पद्धतीने स्त्री पुरुष सर्वांनी मिळून एक आगळीवेगळी वटपौर्णिमा साजरी केली आणि एकमेकांना शुभेच्छा दिल्या.

virat kohli
विराट कोहलीची विश्वचषकातून माघार? तातडीने मुंबईला रवाना झाल्याने चर्चांना उधाण
Sharad Pawar NCP
“ते सहसा माझ्या शब्दाला नकार देत नाहीत”; शरद पवारांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा, म्हणाले…
asim sarode on rahul narvekar (1)
“अध्यक्षांनी अपात्रतेबाबत चुकीचा निर्णय दिला, तर…”, कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंचं मोठं वक्तव्य
उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीने कोणते कपडे घालावेत, हे ठरवणारे तुम्ही कोण?

हेही वाचा – नवी मुंबई : झाडांची अतिरिक्त छाटणी, महापालिकेचे दुर्लक्ष

सर्वांनी या अनोख्या वटपौर्णिमेचे स्वागत केले आणि दरवर्षी वटपौर्णिमेला एक तरी वडाचे झाड लावू असा संकल्प केला. यावेळी भाजपा महिला मोर्चाच्या मंगल घरत, राज कोठारी, प्रवीण गावडे, विनायक गिरी, संतोष ढेंबरे, अंजनी सैनी, सुषमा निघोट, पूजा गावडे, स्मिता जाधव, विमल पेरवी, राणी ढेंबरे, लीलावती ढेंबरे आदी उपस्थित होते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Vat purnima celebrated by planting trees in navi mumbai ssb

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×